मुंबई | केंद्रीय तपास यंत्रणांनी गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. अशातच आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रडारवर आहेत.
सक्तवसूली संचनालयानं उद्धव ठाकरेंचे मेव्हणे श्रीधर पाटणकरांच्या मालमत्तेवर कारवाई केली आहे. तब्बल 6 कोटी 45 लाख रूपयांची संपत्ती जप्त केली आहे.
श्रीधर पाटणकरांवर ईडीनं कारवाई केल्यानंतर आता राज्यात राजकारण पेटलं आहे. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत आहे.
भाजप आमदार नितेश राणेेंनी चक्क आता उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राणे आणि शिवसेना वाद वाढण्याची शक्यता आहे.
श्रीधर पाटणकरांचं प्रकरण आज ना उद्या बाहेर येणारच होतं. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकासोबत असं होणार असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे, असं राणे म्हणाले आहेत.
सचिन वाझेंकडून पैसे कुठं फिरायचं हे आता बाहेर येत आहे. मुख्यमंत्री आता कशासाठी थांबले आहेत?, त्यांनी राजीनामा द्यावा, असं राणे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांना आता घरात बसून राहात येणार नाही. ठाकरेंनी राज्यातील जनतेला उत्तर द्यावं, असा सल्लाही नितेश राणेंंनी ठाकरेंना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मेव्हण्याची संपत्ती ईडीकडून जप्त
सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा
The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”
अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
“वाकणार नाही, मोडणारही नाही, आमचा बाल कोणी बाका करू शकत नाही”