मुंबई | सक्तवसूली संचनालयानं उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) मेव्हणे श्रीधर पाटणकरांच्या मालमत्तेवर कारवाई केली आहे. तब्बल 6 कोटी 45 लाख रूपयांची संपत्ती जप्त केली आहे.
ईडीच्या या कारवाईनंतर आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अशातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळालं?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. त्यांच्या नशिबी आत्महत्या आल्या, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.
आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर पडली. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच, अशी घणाघाती टीका देखील नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
Uddhav Thackeray: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा”
Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मेव्हण्याची संपत्ती ईडीकडून जप्त
सलमान खानला होता ‘हा’ गंभीर आजार; स्वत: भाईजानने केला धक्कादायक खुलासा
The Kashmir Files: “मी जबाबदार असल्याचं आढळल्यास मला फाशी द्या”
अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…