“एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं”

मुंबई | नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आपलं आयुष्य सुखकर करावं, अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली आहे. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

आज जे आमच्या विरुद्ध आणि भाजपविरुद्ध बोलणारे लोक आहेत त्यांनी रामदास कदमांकडून बोध घ्यावा नाहीतर त्यांच्यासारखी इतर शिवसेना नेत्यांची अवस्था होईल, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या चौकटीत तयार झालेले ते कडवट शिवसैनिक आहेत. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या पदावर बसायला पाहिजे होतं. पण त्यांना दोन वर्षापासून थांबवून ठेवलं आहे, असंही नितेश राणे म्हणालेत.

मुख्यमंत्री बदलायची वेळ आली तर आदित्य ठाकरेंशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार केला जाणार नाही. म्हणून एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करुन टाकावं, असा सल्ला नितेश राणेंनी एकनाथ शिंदेंना दिला आहे.

उद्धव ठाकरे यांचं जग त्यांच्या कुटुंबियांपर्यंत आहे. विधान परिषदेसाठी जागाही वरळीमध्ये दिली, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधानांप्रमाणे लोकभावनेची ताकद ओळखावी, अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जावं, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.

मराठा समाजाला अंधारात टाकणार नाही. हवे तर पुन्हा गोलमेज परिषद घेतली जाईल. पाटील किंवा देशमुखांच्या मुलांची चिंता नाही. परंतु आघाडी सरकारला खानच्या मुलाची चांगलीच चिंता असल्याचा टोलाही नितेश राणेंनी यावेळी बोलताना लगावला आहे.

ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस पाऊले उचलली पाहिजे, अशी मगणी नितेश राणेंनी केलीये.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा युती सरकारने 2018 मध्ये कायदा करून मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिलं. त्यामुळे मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

“…अन्यथा सरकार बरखास्त करून निवडणुकांना सामोरं जा” 

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती! 

पुढील दोन दिवस राज्यातील ‘या’ ठिकाणी पाऊस, हवामान खात्याचा इशारा 

  ‘सत्यमेव जयते’; मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर नवाब मलिक यांचे सूचक ट्विट

  महाराष्ट्राचं टेंशन वाढलं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली धक्कादायक माहिती