मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल यंदा कणकवलीतून लागला.
विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा कणकवलीतून धक्कादायक पराभव झाला. सतीश सावंत यांचा पराभव शिवसेना आणि महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या गटाने कणकवलीत वर्चस्व स्थापन करत शिवसेना व महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. यंदाची सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची समजली जात होती.
सतीश सावंत यांच्या पराभवानंतर अज्ञातवासात असलेले भाजप आमदार नितेश राणे पहिल्यांदाच समोर आले आहे. नितेश राणे यांनी फेसबुक पोस्ट करत सतीश सावंत यांना डिवचलं आहे.
नितेश राणे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकासंदर्भात नितेश राणे यांनी हा फोटो शेअर केला आहे.
सतीश सावंत यांचा पराभव झाल्यानंतर नितेश राणेंनी ‘गाडलाच’ या आशयाची एक पोस्ट शेअर केली आहे. एक फोटो शेअर करत नितेश राणेंनी त्याला ‘गाडलाच’ असं कॅप्शन दिलं आहे.
या फोटोत नितेश राणे सतीश सावंत यांच्या मानेवर उभे आहेत. नितेश राणे यांची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
दरम्यान, शिवसेनेचे कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीतील प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर नितेश राणे चांगलेच अडचणीत आले. या प्रकरणापासून नितेश राणे अज्ञातवासात आहेत.
नितेश राणेंचा ठावठिकाणा कोणालाच माहिती नाही. सतीश सावंत यांच्या पराभवानंतर नितेश राणे सोशल मीडियावर परतले आहेत. तरीही नितेश राणे नक्की कुठे याचा कोणालाच पत्ता नाही.
महत्वाच्या बातम्या-
‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल
सिंधुदुर्गात नारायण राणेंचा सेनेला ‘दे धक्का’; सतीश सावंत पराभूत
‘मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नका’; संजय राऊतांचा राज्य सरकारला घरचा आहेर
ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला जेवण दिलं नाही म्हणून वेटर सोबत केलं धक्कादायक कृत्य
तुम्ही पण प्लास्टिकच्या डब्ब्यातून जेवण जेवता का?, मग ही बातमी एकदा वाचाच