‘धरणमूत्र पवार ओकून गेले,अख्खी चिवसेना ओकत होती पण…’; निलेश राणेंचा हल्लाबोल

सिंधुदुर्ग | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मतमोजनीला आज सुरूवात झाली. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लढतीत भाजप आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

पहिल्या टप्प्यातील मतमोजणी सध्या सुरू आहे. यात भाजपकडे 7 जागा तर महाविकासआघाडी सरकारकडे 5 जागा असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी यंदा चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल कणकवलीतून लागला.

विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा कणकवलीत पराभव करत नारायण राणेंच्या गटाने सेनेसह महाविकास आघाडी सरकारलादेखील जोरदार धक्का दिला आहे. यंदाच्या निवडणुकीत राणेंची प्रतिष्ठा पनाला लागली होती.

भाजपच्या यशानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आमची निवडणुक सोप्पी होती म्हणत निलेश राणेंनी महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे.

‘धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती, पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला’, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.

कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटत होतं, असा टोला देखील निलेश राणेंनी लगावला आहे. तर ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

काळ्या विन्या राऊत तू बोलत रहा, आमची निवडणूक सोप्पी होती, असं म्हणत निलेश राणेंनी पुन्हा एकदा टीकेची झोड उठवली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आघाडी घेतल्यावर निलेश राणेंनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 10 जागांची गरज असते. भाजपने सध्या 7 जागांवर विजयी झेंडा रोवला असून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर भाजपला आणखी 3 जागांची गरज आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

सिंधुदुर्गात नारायण राणेंचा सेनेला ‘दे धक्का’; सतीश सावंत पराभूत

‘मुंबईत बसून हवेत गोळीबार करू नका’; संजय राऊतांचा राज्य सरकारला घरचा आहेर

ऐकावं ते नवलंच! कुत्र्याला जेवण दिलं नाही म्हणून वेटर सोबत केलं धक्कादायक कृत्य

तुम्ही पण प्लास्टिकच्या डब्ब्यातून जेवण जेवता का?, मग ही बातमी एकदा वाचाच

‘भाषेऐवजी भावना आणि शब्दांऐवजी संवेदना समजून घ्या’, ‘त्या’ पत्रावरून रोहित पवारांची MPSCला विनंती