संघाच्या गुरुंनी आम्हाला कधीही मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवला नाही- नितीन गडकरी

नागपूर | हिंदूंना जातीवादी म्हणणाऱ्यांनी हे समजून घ्यावं. मी देशातील मुस्लिमांना आश्वासन देतो, आमच्या संघाच्या गुरुंनी आम्हाला कधीही मुस्लिमांचा द्वेष करायला शिकवला नाही. संघाचे बाळासाहेब देवरस यांनी समाजातील अस्पृश्यता आणि जाती भेदाला सर्वात वाईट गोष्ट म्हटलं, असं भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

भारतातील मुस्लिमांना बाहेर देशात गेल्यावर हिंदू म्हणूनच ओळखलं जातंं, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ नागपुरात मोर्चा काढण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते.

मुस्लिम शरणार्थींना जगात 100 ते 150 देशांचे पर्याय आहेत. मात्र, हिंदू, बौद्ध, इसाई, पारशी लोकांसाठी भारत हाच पर्याय आहे, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, पाकिस्तान, बांग्लादेशमधील अल्पसंख्याकांना जेव्हा गरज लागेल तेव्हा भारत मदत करेल असं महात्मा गांधींनी म्हटलं होतं. पाकिस्तानने स्वतःला मुस्लिम राष्ट्र घोषित केलं तेव्हा महात्मा गांधींनी भारत हिंदू राष्ट्र असणार नाही असं घोषित केलं होतं, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-