वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी विराटच्या वर्षभराच्या मेहनतीवर फेरलं पाणी!

कटक | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ‘किंग विराट कोहलीची ओळख ‘रन मशिन’ अशी केली जाते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात विरोधी संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडणारा कोहली सध्या चालू असलेल्या वेस्ट इंडिज विरूद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत अपयशी ठरला आहे. त्यामुळं विराटच्या वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फेरलं आहे.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या सामन्यात विराट चार धावा काढून बाद झाला. दुसऱ्या सामन्यात विराट शून्यावर बाद झाला. विराट तब्बल दोन वर्षानंतर पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात धावा न केल्यानं विराटला सलग तिसऱ्या वर्षी वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता येणार नाही.

विराट गेल्या दोन वर्षापासून वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. विंडीजविरुद्धच्या सलग दोन सामन्यातील अपयशामुळे विराटला टॉपवर राहता येणार नाही. मालिकेत रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात 159 धावा केल्या होत्या. या खेळीने रोहितने विराटला मागे टाकले होते. सध्या रोहितच्या 1 हजार 427 धावा तर विराटच्या 1 हजार 303 धावा झाल्या आहेत.

दरम्यान,वेस्ट इंडिजविरुद्ध होणारा तिसरा सामना कटक येथील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानावर विराटची कामगिरी फार चांगली नाही. विराटने या मैदानावर तीन वनडे आणि एक टी-२० सामना खेळला आहे. त्यात त्याने 3, 22, 1 आणि 8 अशा धावा केल्या आहेत. भारतातील अन्य कोणत्याही मैदानापेक्षा हे मैदान विराटसाठी सर्वात अनलकी ठरलं आहे.

महत्वाच्या बातम्या-