“मी स्वप्नवत नेता आहे, मी काम केलं नाही तर लोक मारतील”

नवी दिल्ली | ज्या देशात पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण या चार गोष्टी घडतात त्या देशात संधी निर्माण होतात, असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केलं आहे. ते दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.

गडकरींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी (US President) यांच्या एका वाक्याची आठवण करून दिली, की अमेरिका श्रीमंत आहे, त्यामुळे अमेरिकेचे रस्ते चांगले झाले नाहीत, तर चांगल्या रस्त्यांनी अमेरिका श्रीमंत झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.

आतापर्यंत केलेल्या कामांवर लोक खूश आहेत, पण ते केवळ 15-20 टक्के आहे. येत्या काही वर्षांत जेव्हा सर्व कामं पूर्ण होतील तेव्हा 2024 पर्यंत आपल्या रस्त्यांची पायाभूत सुविधा अमेरिकेसारखी होईल, असं नितीन गडकरी यांनी म्हटल आहे.

दरम्यान, आम्हाला अशा मार्गाची गरज आहे. ज्यामुळे गरिबांचा फायदा होईल. रोजगार मिळेल आणि देशाचा दर वाढेल, असं नितीन गडकरी म्हणालेत.

मी स्वप्नातला नेता आहे. पण मी स्वप्न पूर्ण केली नाही तर जनता मारेल. मी काम केलं नाही तर लोक मारतील, असं नितीन गडकरी म्हणतील.

महत्त्वाच्या बातम्या- 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर 

“किरीट सोमय्या भाजपचे नाच्या आहेत, आणि देवेंद्र फडणवीस….” 

स्वत:च्याच वरातीत नाचणं नवरदेवाला पडलं महागात, पठ्ठ्या DJ वर नाचत बसला तोवर… 

‘ट्रेनमधून एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास….’; न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय  

ना नाश्ता, ना जेवण! सदावर्ते म्हणाले, ’18 दिवस फक्त पाणी प्यायलो’