केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर

मुंबई | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांचे आणखी तीन भत्ते वाढवण्याचा सरकार विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. यावर निर्णय झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी वाढ होणार आहे.

सरकारने महागाई भत्त्यासह एचआरए वाढवल्यास शहर भत्ता आणि प्रवास भत्ता यावरही परिणाम होईल. वास्तविक, डीए वाढल्याने या दोन्ही भत्त्यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा वाढली आहे.

महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर घरभाडे भत्त्यात (HRA) वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने एचआरए वाढवण्याचा निर्णय घेतल्यास 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

दरम्यान, गेल्या दिवशी केंद्र सरकारने महागाई भत्ता (DA) 31 टक्क्यांवरून 34 टक्के केला होता.

यानंतर अर्थ मंत्रालयाने जानेवारी महिन्यापासून वाढीव भत्त्याची थकबाकी (Arrears) देण्याची घोषणा केली. मात्र, कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांची थकबाकी अपेक्षित होती.

महत्त्वाच्या बातम्या- 

“किरीट सोमय्या भाजपचे नाच्या आहेत, आणि देवेंद्र फडणवीस….” 

स्वत:च्याच वरातीत नाचणं नवरदेवाला पडलं महागात, पठ्ठ्या DJ वर नाचत बसला तोवर… 

‘ट्रेनमधून एखादी व्यक्ती पडून जखमी झाल्यास….’; न्यायालयाचा सर्वात मोठा निर्णय  

ना नाश्ता, ना जेवण! सदावर्ते म्हणाले, ’18 दिवस फक्त पाणी प्यायलो’ 

“3 मे ला काही तरी घडणार असं वाटतं”, राज्यातील ‘या’ बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ