नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू आहे. आपापले मुद्दे घेऊन विविध पक्ष जनतेसमोर जात आहेत. भाजपने आज आपलं संकल्प पत्र प्रसिद्ध केलं आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपने संकल्पपत्र प्रसिद्ध केलं आहे.
राजधानी दिल्ली भारताची शान आहे. दिल्लीसाठीचं पाणी आणि प्रदुषणमुक्त हवेसाठी केंद्र सरकारने विविध योजना लागू केल्या आहेत. आजच्या संकल्पपत्रात भाजपने दिल्लीकरांना प्राथमिक सुविधांसाठी आश्वस्त केल्याची माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
केंद्र सरकार दिल्लीसाठी खूप चांगल्या योजना राबवत आहेत. दिल्ली भाजपच्या नेतृत्वात देखील दिल्लीचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने होईल तेव्हा येणाऱ्या निवडणुकीत भाजपला भरभरून मतदान करा, असं आवाहन गडकरींनी यावेळी केलं.
दरम्यान, दिल्ली भाजपच्या संकल्पपत्रात दिल्लीकरांना अनेक आश्वासन दिली आहेत. घर, वीज, पाणी, शाळा आणि रूग्णालय यांवर भाजपने भर दिला आहे.
मुझे विश्वास है कि केंद्र में मोदी जी और प्रदेश में भाजपा के नेतृत्व वाली सरकार से दिल्ली का विकास बुलेट ट्रेन की रफ्तार से होगा। #DeshBadlaDilliBadlo pic.twitter.com/uCAIHRWKvL
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) January 31, 2020
महत्त्वाच्या बातम्या-
-हिटलरने जर्मनीत केलं तोच प्रकार भारतात घडवण्याचा प्रयत्न; आव्हाडांचा मोदी-शहांवर आरोप
-अरविंद केजरीवालांनी घातलीये भाजप समर्थकांच्या काळजाला साद; व्हीडिओ नक्की बघा…
-छत्रपती संभाजी महाराजांचा सर्वात मोठा पुतळा उभारणार- फडणवीस
-‘रंग बरसे’ गाण्यावर आमदार प्रशांत गडाखांनी पत्नीसह धरला ताल…!; पाहा व्हीडिओ