“एकनाथ शिंदेंना आम्ही असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी कुठेही थांबणार नाही”

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असं अमृत पाजलं आहे की, मला वाटतंय राज्याच्या विकासाची यात्रा बुलेट ट्रेनपेक्षाही वेगने पुढे जाईल, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

मुंबईत आयोजित केलेल्या आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित केलेल्या संकल्प ते सिध्दी परिषदेत नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

शिंदे आणि देवेंद्र पडणवीस यांचा आज हा पहिलाच कार्यक्रम होता. आम्ही त्यांना असं अमृत पाजलं आहे, की मला वाटतंय त्यांची गाडी आता थांबणार नाही. आता महाराष्ट्राच्या विकासाची यात्रा बुलेट ट्रेनपेक्षा जास्त वेगाने पुढे जाईल, असं गडकरींनी म्हटलं.

महाराष्ट्रात बांधण्यात आलेला समृध्दी महामार्ग हा महत्वपूर्ण ठरणार असून येणाऱ्या काळात वेगवेगळे रस्ते बांधून संपूर्ण देशात रोड कनेटिव्हिटीचे जाळे निर्माण केले जाणार आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

महाराष्ट्राने कायमच देशाच्या आर्थिक विकासात महत्वाचे योगदान दिले आहे. सेवा, कृषी, आरोग्य अशा क्षेत्रात महाराष्ट्राने उत्कृष्ट काम केले असून महाराष्ट्रात येणाऱ्या काळात बांधण्यात येणारे रस्ते, रोप वे यामुळे अधिकच्या पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत होणार आहे, असंही ते म्हणालेत.

दरम्यान, देशाला पाच ट्रिलीअन डॉलरची अर्थव्यवस्था बनवंण्याचं स्वप्न मुंबई आणि महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी 

मोठी बातमी! संजय राऊतांना न्यायालयाचा सर्वात मोठा झटका 

मध्यावधी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… त्यामुळे नांदा सौख्यभरे अशाच शुभेच्छा देतो’, छगन भुजबळांचा शिंदे सरकारला टोला 

शिंजो अबे यांच्यावर हल्ला करणारी ‘ती’ व्यक्ती ताब्यात, महत्त्वाची माहिती समोर