“उद्धव ठाकरे हे आमचं दैवत पण आमच्या दैवताला मातोश्रीबाहेर काढून चूक झाली”

मुंबई | उद्धव ठाकरे थोडं रागाने बोलत असतील पण भविष्यात ते समजून घेतील. उद्धव ठाकरे आमचे दैवत आहेत. पण आमच्या दैवताला बाहेर काढून चूक झाली, असं वक्तव्य कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलंय.

राजेश क्षीरसागर यांनी ठाकरेसेनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.कोल्हापूरचा विकास शिंदेंमुळेच होऊ शकतो असा विश्वास क्षीरसागर यांनी व्यक्त केला.एकनाथ शिंदेंजवळ विकासाचे व्हिजन असल्याचंही क्षीरसागर म्हणाले.

पक्षात कायम एकनाथ शिंदेंनी सर्वांना सांभाळून घेतल्याचं क्षीरसागर म्हणाले.उद्धव ठाकरेंनी युतीबाबत तक्रारी समजून न घेतल्याची खदखद क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.

राजकारणात कोणीच कोणाचा शत्रू नसतो, त्यांचा आणि आमचा व्यवसाय नाही, बांधाला बांध नाही, देशातील अनेक राजकीय नेते एकत्र आले आहेत. त्यामुळे मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. चंद्रकांत पाटील आमचे नेते आहेत. ते जिल्ह्याचे नेतेच नाहीत, तर राज्याचे नेते असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

बंडखोर शिंदे गटाच्या गळाला लागण्यापूर्वी राजेश क्षीरसागर यांनी अनेकवेळा चंद्रकांत पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यांना हिमालयात पाठवू, पाठीत खंजीर खूपसला, भाजपच आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

आम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलो, तेव्हा प्रथमदर्शनी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, विश्वासदर्शक ठराव जेव्हा पास झाला तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून जे काही भाषण झालं त्यानंतर सर्व शिवसैनिकांच्या मनातील गैरसमज दूर झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

“एकनाथ शिंदेंना आम्ही असं अमृत पाजलंय की त्यांची गाडी कुठेही थांबणार नाही” 

मोठी बातमी! शिदे-फडणवीस सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी 

मोठी बातमी! संजय राऊतांना न्यायालयाचा सर्वात मोठा झटका 

मध्यावधी निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… त्यामुळे नांदा सौख्यभरे अशाच शुभेच्छा देतो’, छगन भुजबळांचा शिंदे सरकारला टोला