मुंबई | मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांंचं नाव घेतलं जातं. मागील काही वर्षात त्यांनी अनेक कामं करून दाखवली आहे.
भाजप सत्तेत आल्यानंतर काँग्रेसची ताकद कमी होत आहे. अनेक राज्यात काँग्रेस तोंडघशी पडल्याचं चित्र आहे. त्यानंतर आताच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
अशातच आता काँग्रेसमध्ये खडाजंगी पहायला मिळत आहे. त्यामुळे आता काँग्रेसचं पुढे काय होणार, असा सवाल उपस्थित केला जातोय. त्यावर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
देशातील लोकशाही टिकण्यासाठी काँग्रेसने मजबूत होणं गरजेचं आहे, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा गडकरींनी काँग्रेसला सल्ला दिलाय.
भाजप 4 राज्यात सरकार बनवत आहे, पण भाजपाला हरवायचं असेल तर विरोधी पक्षाने कोणता फॉर्म्युला वापरायला हवा?, अशा सवाल नितीन गडकरींना विचारण्यात आला.
मी भाजपला जिंकण्याचा मार्ग सांगू शकतो, पराभव करण्याचा मार्ग विरोधकांनी शोधायला हवा, असं नितीन गडकरी उत्तर देताना म्हणाले आहेत. गडकरींच्या या उत्तराची सध्या चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
दरम्यान, मी आणीबाणीमधील प्रॉडक्ट आहे. जे.पी. आंदोलनाच्या वेळी मी अभ्यास करत होतो. त्यानंतर अचानक जनता दलासोबत राजकारणात प्रवेश केल्याची आठवण गडकरींनी यावेळी सांगितली.
महत्त्वाच्या बातम्या –
“आशिषजी जरा तोंड सांभाळून बोला, अन्यथा…”
Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा
काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…
Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज
“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं”