मुंबई | हिंदू नववर्षाच्या सुरूवातीला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. असं असताना राज्यात शिवसेना-भाजप (Shivsena-bJP) हिंदूत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकमेकांसमोर आले आहेत.
हिंदू सणांच्या वेळी ठाकरे सरकारच्या (Thakeray Government) हाताला लकवा मारतो, असं वक्तव्य करत भाजप नेते आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं होतं.
शेलार यांच्या टीकेनंतर आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर येत आहे. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी शेलार यांच्यावर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना तोंड सांभाळून बोला, अन्यथा शिवसैनिक तुम्हाला पळता भूई सोडणार नाहीत, असा इशारा कायंदे यांनी शेलारांना दिला आहे.
आतापर्यंत कोरोना परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी हिंदू सणांना परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच राज्यातील कोरोना नियंत्रणात राहीला असंही कायंदे म्हणाल्या आहेत.
रामनवमी आणि गुढीपाडवा सणांच्या शोभायात्रांसह मिरवणुकांना परवानगी देण्यावरून भाजपनं सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे.
राज्यात गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असला तरी सरकारनं याबाबत आपली भूमिका अद्यापी स्पष्ट केली नाही, असं शेलार म्हणाले आहेत.
दरम्यान, कायंदे यांच्या जोरदार प्रत्युत्तरानंतर आता शिवसेना-भाजप वाद वाढण्याची शक्यता आहे. शेलार यांनी परवानगीचा मुद्दा सभागृहात देखील उपस्थित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
Deltacron: चीनमुळे भारताला चौथ्या लाटेचा धोका?, ICMR ने दिला ‘हा’ गंभीर इशारा
काय सांगता! Russia-Ukrain युद्धादरम्यान अमेरिकेनं केली चक्क रशियाला मदत; झालं असं की…
Railway Recruitment 2022: परीक्षेविना रेल्वेमध्ये भरती होणार; 10वी पासही करू शकतात अर्ज
“सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे शोधणं महत्त्वाचं”
“सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडीवर भाजपची काळी नजर”