समाजकंटकांना पोलीस ठोकणार की मी ठोकू???- नितीन नांदगावकर

मुंबई : समाजकंटकांना पोलीस ठोकणार का मी ठोकू?, असा सवाल मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी विचारला आहे. फेसबुक व्हिडीओच्या माध्यमातून नांदगावकरांनी आपला संताप व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्याभरात वाहतूक पोलिसांना मारहाण झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नांदगावकरांनी व्हिडीओ शेअर केलेला दिसत आहे.

मुंब्रा येथे काही टपोरी मुलांनी ट्राफिक पोलिसांना धक्काबुक्की करुन मारल्याचा जाहीर निषेध, पोलिसांची कॉलर पकडून पोलिसांना मारणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी नितीन नांदगावकरांनी केली आहे.

आपला समाज कुठे चाललाय? कोणीही येतंय आणि पोलिसांना टपली मारतोय. पोलिसांची भीती आहे कुठे. पोलिसांना काही मुले मारत असताना बघे व्हिडीओ काढत आणि तमाशा बघत राहतात, जे पोलीस रात्रंदिवस जनतेची सेवा करतात, त्यांच्या मदतीला कोणीच जाऊ नये, अशी चिंताही नांदगावकरांनी व्यक्त केली आहे.

वर्दीचा मान जे नागरिक ठेवत नसतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, तीही भर चौकात. ह्यापुढे पोलिसांवर कोणी हात उचलेल त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावाच लागेल, अशी मागणीही त्यांनी केली.

पोलीस अशा समाजकंटकांना ठोकू शकत नसेल तर मी त्या सर्वांना रस्त्यावर धिंड काढून ठोकणारच. पोलिसांची भीती असलीच पाहिजे आणि ती नसेल तर येणारा काळ खूप भयानक असेल आणि मी ते होऊ देणार नाही, असा इशाराही नितीन नांदगावकरांनी दिला.

https://www.facebook.com/watch/?ref=external&v=425408924763148

महत्वाच्या बातम्या-

-…यापुढे राष्ट्रवादीच्या सभेत ‘हे’ दोन झेंडे राहतील- अजित पवार

-भारताच्या नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरीवर ‘वाडा’ची बंदीची कारवाई!

-बालाकोट हवाई हल्ल्याचा थरार पडद्यावर दिसणार!

-अमिताभ बच्चन यांचा दिलदारपणा; वयानं लहान असणाऱ्या ‘या’ स्पर्धकाच्या पडले पाया

-गेल्या 70 वर्षातली अर्थव्यवस्थेची सर्वात वाईट स्थिती; निती आयोगाने दिली कबुली