लोडशेडिंगबाबत नितीन राऊतांचं मोठ वक्तव्य, म्हणाले…

नागपूर | पैसा तर लागणारच आहे. प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो. कोळसासाठी कंपन्या पैसा मागत आहेत. ओपन एक्सेसमधून वीज घेतो तेव्हा पैसा लागतो. वर्किंग कॅपिटल गरजेची आहे, असं ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी सांगितलं.

केंद्र सरकारने बँक आणि वित्तीय संस्थांना पत्र लिहून सांगितलं आहे की आम्हाला कर्ज देऊ नये. अशा अवस्थेत आम्हाला ग्रामविकास आणि नगर विकास खात्याकडे थकीत असलेला निधी आवश्यक आहे, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.

सध्या आम्हाला फक्त अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी मिळालेला आहे. मात्र नगरविकास व ग्रामविकास खात्याकडे थकित असलेला 9 हजार कोटींचा निधी मिळालेला नाही. दोन्ही विभागांकडे मिळून 9 हजार कोटीचा निधी असून अपेक्षा आहे तो लवकर मिळेल, असंही ते म्हणाले.

विजेची उपलब्धता आणि मागणी यानुसार भारनियमन करावं लागतं. मात्र लोकांनी जर विजेचे काटकसरीने वापर केला, विजेची बचत केली, तर भारनियमन टाळता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी विजेची बचत करावी, असं ते म्हणालेत.

कोळसा टंचाईचं संकट मोठ्या प्रमाणात आहे. त्यावर उष्णता वाढली आहे, वीज मागणी वाढली आहे. सण उत्सव सुरू आहेत. काल मी तिन्ही कंपन्यांची बैठक घेतली, असं त्यांनी सांगितलं.

कोरोना संपला त्यामुळं सर्व उद्योग मोठ्या जोमानं सुरू आहेत. अलीकडे कोळसा उपलब्ध होत नाही आहे. उपलब्ध झाला तर रेल्वे रॅक मिळत नाही, आमचे प्रतिनिधी केंद्र सरकारकडे गेले आहेत, अशी माहिती नितीन राऊतांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“दिलासा घोटाळा अलकायदा आणि कसाबपेक्षा भयंकर, जस्ट वेट अॅड वाॅच” 

पंक्चरच्या दुकानात पोरं उभी होती, अचानक असं काही झालं की…; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV व्हिडीओ

Russia-Ukrain War: युक्रेनने रशियाला दिली ‘ही’ मोठी ऑफर, झेलेंस्की म्हणाले…

मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्यावर महिलेचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Aryan khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीची मोठी कारवाई!