शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र देणारे तसेच असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 14 एप्रिल 1891 रोजी जन्म झाला.
डॉ. भीमराव आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar) यांचं जीवन खूप संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये आंबेडकरांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
14 एप्रिल 1928 रोजी जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुण्यात प्रथमच डॉ. भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी केली. जनार्दन सदाशिव रणपिसे हे आंबेडकरांच्या अत्यंत निष्ठावान अनुयायांपैकी एक होते.
दरवर्षी 14 एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी करण्याची परंपरा सुरू झाली. भारतात, 14 एप्रिल ही दरवर्षी अधिकृत सार्वजनिक सुट्टी असते.
आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आंबेडकर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असते.
डॉ. बाबासाहेब दलित समाजाच्या समान हक्कासाठी लढायचे. याशिवाय भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करून जात, धर्म, संस्कृती, पंथ इत्यादी बाजूला सारत सर्व नागरिकांना समान अधिकार दिले.
आंबेडकर राज्यसभेतून दोनदा खासदार म्हणून निवडून आले. डॉ भीमराव आंबेडकर यांचं निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झालं. 1990 मध्ये बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या-
लोडशेडिंगबाबत नितीन राऊतांचं मोठ वक्तव्य, म्हणाले…
“दिलासा घोटाळा अलकायदा आणि कसाबपेक्षा भयंकर, जस्ट वेट अॅड वाॅच”
पंक्चरच्या दुकानात पोरं उभी होती, अचानक असं काही झालं की…; पाहा अंगावर काटा आणणारा CCTV व्हिडीओ
Russia-Ukrain War: युक्रेनने रशियाला दिली ‘ही’ मोठी ऑफर, झेलेंस्की म्हणाले…
मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्यावर महिलेचे गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ