‘नितीनजी, RSSचं हॉस्पिटल फक्त हिंदूंसाठीच आहे का?’; टाटांच्या प्रश्नावर गडकरी म्हणाले…

पुणे | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं नाव मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्र्यांमध्ये घेतलं जातं. गडकरी अनेक कार्यकर्माला उपस्थिती लावतात. त्यावेळी ते वेगवेगळे किस्से देखील ऐकवतात.

आज पुण्यातील सिंहगड रोड परिसरात असलेल्या एका धर्मादायी रुग्णालयाचं उद्घाटन होतं. या रूग्णालयाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा सांगितला.

जेव्हा मी महाराष्ट्र शिवसेना-भाजपच्या तत्कालीन सरकारमध्ये मंत्री होतो तेव्हा एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्याने रतन टाटांना उद्धाटनासाठी बोलवावं, अशी विनंती केली होती.

त्यानंतर मी रतन टाटांना उद्धाटनाला याल का विचारलं. हे हॉस्पिटल फक्त हिंदूंसाठीच आहे का?, असा सवाल टाटांनी मला केला, असं गडकरी म्हणाले.

असं तुम्हाला का वाटतं?, असं विचारल्यावर टाटा म्हणाले हे आरएसएसचं रुग्णालय आहे ना म्हणून…, असं टाटा गडकरींना म्हणाले. त्यावर गडकरींनी टाटांना हे रुग्णालय सर्व समाजासाठी असल्याचं सांगितलं.

आरएसएसमध्ये धर्मावर आधारित अशा प्रकारचा भेदभाव चालत नाही, असंही गडकरी यावेळी म्हणाले आहेत. मी त्यांना अनेक गोष्टी समजावून सांगितल्या त्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला, असंही गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या- 

पालकांनो काळजी घ्या! लहान मुलांमध्ये होतोय कोरोनाचा प्रसार

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची खुशखबर; अर्थ मंत्रालयाने केली मोठी घोषणा

“…आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी”

यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“…आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या”, संजय राऊत RSS वर बरसले