पालकांनो काळजी घ्या! लहान मुलांमध्ये होतोय कोरोनाचा प्रसार

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून देशाात आणि जगभरात कोरोना साथीने हाहाकार माजवला आहे. कोरोना रूग्ण कमी झाल्याने राज्यात कोरोना निर्बंध हटवण्यात आले आहेत. मात्र, जगभरातील काही देशांमध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचं पहायला मिळतंय.

कोरोना रूग्ण कमी झाल्याने देशातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच काही राज्यांमध्येही कोरोना रूग्ण वाढत आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांना कोरोनाची जास्त लागण होत असल्याचं समोर आलं आहे.

लहान मुलांचे लसीकरण वेगाने व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. देशात गेल्या महिन्यापासून मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.

12 ते 14 वय पुर्ण असणाऱ्या मुलांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. Corbevax ही लस दिली जात असून दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे. यासंदर्भातील गाईडलाईन्स राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आल्या होत्या.

XE या व्हेरिएंटमुळे लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढतोय का?, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे. कोरोना विषाणूमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स होत आहेत. त्यामुळे अंतिम उपाय शोधणे तज्ज्ञांना कठीण जात आहे.

लहान मुले जास्त प्रमाणात संक्रमित होत असल्याने नवा व्हेरिएंट कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालकांनी घाबरण्याची गरज नाही. मुलांमध्ये संक्रमण असेल तर त्याचा धोका नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जी मुले संक्रमित झाली आहेत त्यांचे जिनोम सिक्वेंसिंग करण्यात यावे, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. त्यामुळे संक्रमित करणारा व्हेरिएंट नेमका कोणता आहे हे समजू शकेल.

जर संक्रमित करणारा व्हेरिएंच ओमिक्रॉन असेल तर घाबरण्याची गरज नाही. कारण ओमिक्रॉन व्हेरिएंट विरोधात मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर निर्माण झालेली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची खुशखबर; अर्थ मंत्रालयाने केली मोठी घोषणा

“…आता शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी”

यंदाच्या पावसाने बळीराजा सुखावणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

“…आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या”, संजय राऊत RSS वर बरसले

भाजप-मनसे युती होणार?; चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं…