नंबर 1 यारी! खचलेल्या लाडक्या चिकूसाठी युवराजने लिहिलं पत्र, म्हणाला…

मुंबई | भारताचा माजी स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि भारताचा सध्याचा स्टार फलंदाज विराट कोहली यांची दोस्ती तर संपुर्ण जगाला माहिती आहे.

युवराजच्या अखेरच्या क्रिकेट करियरच्या काळात विराटने युवराजला खूप सपोर्ट केला होता. युवराजला भारतीय संघात स्थान देऊन सुखद निरोप देण्याची संधी मिळवून दिली.

तर विराट ज्यावेळी फाॅर्ममध्ये नसायचा त्यावेळी युवराजने देखील त्याला पाठिंबा दिली होता. त्यामुळे या दोघांची यारी क्रिकेटमधील नंबर वन यारी आहे, असं म्हणतात.

अशातच आता विराटच्या कठीण काळात आता युवराज सिंगने विराटला एक पत्र लिहिलं आहे. मैदानावरील तुझी आवड आणि शिस्त आणि क्रिकेट या खेळाप्रती तुझे समर्पण हे देशातील प्रत्येक तरुणाला बॅट उचलून निळ्या जर्सीमध्ये खेळण्यासाठी प्रेरित करतं, असं युवराज म्हणाला.

तू दरवर्षी तुझ्या क्रिकेट खेळण्याचा स्तर उंचावला आणि अनेकदा यश संपादन केलं. तू एक उत्तम कर्णधार आणि महान नेता असल्याचं युवराजने म्हटलं आहे.

मला तुला आणखी अनेक धावा काढताना पाहायचं आहे. मी आनंदी आहे की आपण एक सहकारी आणि मित्र म्हणून नातं निर्माण केलंय, असंही युवराज म्हणाला.

एकत्र धावा काढणं, लोकांची खेचणं, पंजाबी गाण्यांवर नाचणं आणि स्पर्धा जिंकणं, हे सगळं आपण करायचो असं म्हणत युवराजने त्याला जुन्या आठवणी ताज्या करून दिल्या आहेत.

मेरे लिए तू हमेशा चीकू रहेगा और दुनिया के लिए किंग कोहली. ती आग तुमच्या आत सतत तेवत ठेव, असं म्हणत त्याने विराटचं मनोबल उंचावलं आहे.

तू सुपरस्टार आहेस. तुझ्यासाठी खास गोल्डन बूट, असं म्हणत त्याने विराटला त्याचा गोल्डन बूट पाठवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Corona: महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

  Urrfi Javed: “‘या’ दिग्दर्शकानं माझ्याकडे लैंगिग सुखाची मागणी केली”

  दिशा सालियन आणि सचिन वाझे कनेक्शन?; नितेश राणेंच्या नव्या ट्विटनं खळबळ

  “स्वतः दारू न पिणारे उद्धव ठाकरे जनतेला वाईन का पाजत आहेत”

  मोठा निर्णय! ‘या’ राज्यानं दारु पिणाऱ्यांचं वय केलं कमी, कायद्यात मोठा बदल