रशिया आणि युक्रेन वादाचा शेअर मार्केटवर मोठा परिणाम, गुंतवणूकदारांना लाखोंचा फटका

मुंबई | रशिया आणि युक्रेन वादाचा आंतरराष्ट्रीय बाजारातही जोरदार पडसाद उमटत आहे. या संघर्षाचा परिणाम शेअर बाजारावरही मोठ्या प्रमाणावर पहायला मिळत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव शिगेला पोहचला आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर मार्केटवर होत असलेला पहायला मिळत आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेन मधील 2 प्रांतांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसून येत आहे. 22 फेब्रुवारी 2022 ला भारतीय शेअर बाजारात उघडताच सेन्सेक्स 1000 पॉंईटसने तर निफ्टी 290 पॉईटसनं घसरण झाल्याचं पहायला मिळत आहे.

भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पहायला मिळत आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात तणावादरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मंगळवारी सलग पाचव्या दिवशी भारतीय शेअर बाजारात त्याचा परिमाम दिसून आला आहे.

प्री मार्केट ओपनिंग सेशनमध्ये सेन्सेक्स 1200 पॉईटसह खाली गेलं आहे, आणि मार्केट ओपन झालं तेव्हा सेन्सेक्सची सुरूवात 999 पॉईटसह घसरण झाली आहे.

निफ्टीची सुरूवात 300 पॉईटसहून अधिक पॉईटसने घसरणीस सुरूवात झाली. शेअर बाजारात पुढील काही मिनिटांत खूप वोलॅटिलिटी दिसून आली आहे.

सेन्सेक्स नं काही वेळातच 150 पॉईटसने रिकवरी सुद्धा केली पण 9.20 वाजता सेन्सेक्स जवळपास 990 पॉईटसने सुरू झाला. 56,700 पॉईटसह सेन्सेक्स ट्रेंड करत आहे. सोमवारी सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली आहे.

आठवड्यात 5 पैकी 4 दिवस शेअर बाजाराची सुरूवात रेड कॅन्डलने झाली होती. सोमवारी मार्केट बंद झाल तेव्हा सेन्सेक्स 149.38 (0.26 टक्के ) पॉईटसने खाली येत 57,683.59 अंकावर आला होता. निफ्टीत 69.65 (0.40 टक्के ) अंकानी खाली येत 17,206.65 अंकावर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स 59.04 पॉईटने खाली .येत 57,832.97 पॉईटने तर एनएसई निफ्टी 28.30 पॉईट्सने घसरणीसह 17,276.30 पॉईटवर बंद झाली.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Corona: महाराष्ट्र मास्कमुक्त होणार का?; उद्धव ठाकरे म्हणाले…

  Urrfi Javed: “‘या’ दिग्दर्शकानं माझ्याकडे लैंगिग सुखाची मागणी केली”

  दिशा सालियन आणि सचिन वाझे कनेक्शन?; नितेश राणेंच्या नव्या ट्विटनं खळबळ

  “स्वतः दारू न पिणारे उद्धव ठाकरे जनतेला वाईन का पाजत आहेत”

  मोठा निर्णय! ‘या’ राज्यानं दारु पिणाऱ्यांचं वय केलं कमी, कायद्यात मोठा बदल