कोरोना झालेल्या आईला कोणीही खांदा द्यायला तयार नाही म्हणून मुलानं……

नवी दिल्ली| देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचे चित्र दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देश हादरलाय. अशा परिस्थितीत विविध ठिकाणी, आॅक्सिडजन, बेड आणि औषधांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवतेय. ही कमतरता भरुन काढण्यासाठी राज्य तसंच केंद्र सरकारही त्यांच्या परीने प्रयत्न करतच आहे.

अशातच हिमाचल प्रदेशच्या कांगा जिल्ह्यातील रानीतालमध्ये मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

रानीतालमध्ये विरसिंह या तरूणाच्या आईचा कोरोनाने मृत्यु झाला. विरसिंहची आई गावची माजी सरपंच असल्याची माहिती समजत आहे. कोरोना झाल्यावर उपचाराआधीच विरसिंहच्या आईचं कोरोनाने निधन झालं. मृतदेह नेण्यासाठी कोणीही खांदा द्यायला पुढं आलं नाही. त्यामुळे शेवटी मृतदेह आपल्या खांद्यावर उचलून घेत अंत्यसंस्काराचं काम पूर्ण केलं असल्याचं विरसिंहने सांगितलं.

भांगवार पंचायतचे प्रमुख सूरम सिंह म्हणाले की, ”मी आजारी होतो, म्हणून त्यांच्या घरी जाऊ शकलो नाही. प्रशासनाकडून पीपीई किटही मागवले होते. मृत व्यक्तीचा मुलगा विरसिंह यांनी सांगितले की, माझे नातेवाईक पीपीई किट घेऊन येत आहेत. मृतदेह उचलण्यासाठी 2 ट्रॅक्टर चालकांशीही संपर्क केला पण त्यांनी काहीही ऐकले नाही.”

या कुटुंबाला गावातील काही लोकांनी मदत केली आणि त्यानंतर ते लाकूड आणण्यासाठीही गेले होते. विरसिंहचा एकट्याने मृतदेह नेण्याचा निर्णय चुकीचा होता, असंही सूरम सिंह म्हणाले. मात्र आपल्याला कोणीही मदत केली नसल्यामुळे एकट्याने मृतदेह घेऊन जाण्याची वेळ आल्याचं विरसिंहने सांगितलं.

दरम्यान, संपुर्ण देश सध्या कोरोनाच्या भयंकर परिस्थितीशी लढत आहे. त्यातच काही राज्यांमध्ये तर कोरोनाने हाहाकार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही नंबर लागतो. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही.

मागील वर्षापासून आपण कोरोनासोबत जगत आहोत, त्याला संपवण्यासाठी लढत आहोत. कोरोनाच्या दुस-या लाटेने तर मृत्युचे तांडवच चालवले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

कौतुकास्पद! पुण्यातील भाजी विक्रेत्या आजीने केली…

चक्रिवादळाचा इशारा; महाराष्ट्रातील ‘या’ भागात…

‘कोरोना विषाणू हा सुद्धा एक जीव असून त्यालाही जगण्याचा…

वजन कमी करण्यासाठी चक्क मांजर करतीय एक्सरसाईज, पाहा व्हायरल…

‘लव यू जिंदगी’ म्हणणाऱ्या तरुणीचा कोरोनाशी लढा…