दिलासादायक! गेल्या 14 दिवसात 78 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

नवी दिल्ली | कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश चिंतेमध्ये आहे. एकाबाजूला कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या तर दुसऱ्याबाजूला अर्थव्यवस्था ठप्प असल्याने रोजगाराची चिंता. देश अशा दुहेरी संकटाचा सामना करत असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

मागच्या 14 दिवसात देशातील एकूण 78 जिल्ह्यांमध्ये एकाही व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशातील वेगवेगळया राज्यांमध्ये मोठया प्रमाणावर कोरोनाच्या चाचण्या सुरु आहेत. त्यामुळे नेमकी किती लोकांना कोरोनाची लागण झाली आहे ते समोर येत आहे. मागच्या 24 तासात देशात 1409 नागरिकांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

दरम्यान, सध्या देशात एकूण 21,393 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-“सर्वपक्षीय उच्चाधिकार समिती स्थापन करुन राज्याच्या हितासाठी सकारात्मक पाऊल टाका”

-रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी राहीबाई पोपेरे यांचा मोलाचा सल्ला

-‘साधूंचे मारेकरी, भाजपचे पदाधिकारी’ म्हणत काॅंग्रेसने ट्विटरवर सादर केला पुरावा

-राज ठाकरेंच्या ‘त्या’ मागणीला तृप्ती देसाईंचा विरोध

-गरीब मजुरांच्या खात्यात तातडीने 7500 रुपये भरा- सोनिया गांधी