धक्कादायक! आता आणखी एका व्हायरसचा धुमाकूळ, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

नवी दिल्ली | सध्या देशात कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. कोरोनानंतर ब्लॅक, व्हाईट आणि येलो फंगसची तसेच ओमिक्रॉनची समस्या उद्भवली आहे. याच व्हायरस सोबत दोन हात करत असतानाच आणखी एका व्हायरसचं निदान झालं असल्याचं समोर येत आहे.

इस्त्रायलमध्ये नव्या व्हायरसचा जगातील पहिला रुग्ण सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हायरसचं नाव फ्लोरोना ठेवण्यात आले असून कोरोना आणि इन्फ्लूएन्झाच्या दुहेरी संक्रमणाचा हा प्रकार असल्याचे इस्त्रायलचे वृत्तपत्र ‘Yediot Ahronot’ म्हटलं आहे.

इस्रायलचे आरोग्य मंत्रालय अजूनही या प्रकरणाचा अभ्यास सुरु असल्याचं म्हटलं आहे. दोन विषाणूंच्या मिश्रणामुळे अधिक गंभीर आजार होऊ शकतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘फ्लोरोना’ इतर रूग्णांमध्ये देखील असू शकतो, जो चाचण्यांअभावी समोर आला नाही. इस्रायल हा जगातील पहिला आणि सध्या एकमेव देश आहे जिथे कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन बूस्टर डोस दिले जात आहेत.

दरम्यान, आधीचदोन वर्षांपासून जगावर कोरोनाचे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण झपाट्याने कमी होत असल्यामुळे कोरोनाचे संकट टळले असे वटत होते. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने डोकेवर काढलं आहे.

ओमिक्रॉनने भारतामध्ये देखील शिरकाव केला असून, भारतामध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनबाधितांचा आकडा 976 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव अधिक गतीने होत असल्याचे दिसून येत आहे.

ओमिक्रॉनचा वेग पहाता मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून, राज्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रातील एकाचा ओमिक्रॉनने मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा 28 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता.

महत्वाच्या बातम्या – 

जास्त झाली??? हॅंगओव्हर उतरवण्यासाठी ‘हा’ उपाय करा 

आता थांबायचं नाय! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा

भिर्रर्र चा नाद घुमणार! ‘या’ ठिकाणी पार पडणार अधिकृत बैलगाडा शर्यत

 “अज्ञानी, अशिक्षित, तिरस्करणीय…”, सोनम कपूरची मुनगंटीवारांवर जोरदार टीका

 चिमुकल्यानं उचलली चिठ्ठी अन् निकालच फिरला, शिवसेनेला मोठा धक्का