“आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय”

मुंबई | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा निकाल काल स्पष्ट झाला. सिंधुदुर्गात महाविकास आघाडीला जोरदार धक्का देत भाजपने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी मुंबईत भाजपच्या कार्यालयाबाहेर जोरदार पोस्टरबाजी पाहायला मिळाली. भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेनेकडून ही पोस्टरबाजी करण्यात आली होती.

या पोस्टरवर हरवला आहे असा मायना देत नितेश राणे यांचा फोटो देण्यात आला होता. सोबतच नितेश राणे यांची माहिती देणाऱ्याला एक कोंबडी बक्षीस मिळेल असंही लिहिण्यात आलं होतं.

सिंधुदुर्गात भाजपचा दणदणीत विजय झाल्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या पोस्टरबाजीला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

हे पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत, असं म्हणत नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं आहे. हे पोस्टर लावायच्याच लायकीचे आहेत, राज्यात कारभार करण्याच्या लायकीचे नाहीत, असा खोचक टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

एका हातात गम आणि दुसऱ्या हातात पोस्टर घेऊन लावत फिरा, अशी टीका नारायण राणेंनी केली आहे. तर सिंधुदुर्गातील विजयानंतर राणेंनी महाविकास आघाडी सरकारला देखील लक्ष्य केलं आहे.

येत्या विधानसभेत महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला आहे. आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, लगानची टीम नकोय आम्हाला, असं सूचक वक्तव्य देखील नारायण राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर नितेश राणे अडचणीत सापडले. या प्रकरणापासून नितेश राणे कोठे आहेत याचा पत्ता कोणालाच नाही. त्यामुळे मुंबईत नितेश राणेंविरोधात पोस्टरबाजी करण्यात आली होती.

या पोस्टरवर हरवला आहे मायना लिहित, नाव नितेश राणे, उंची दीड फुट, रंग गोरा, वर्णन, डोळे नेपाळ्यासारखे, डोक्याने मंद व माहिती देण्याऱ्यास एक कोंबडी बक्षीस असं लिहिण्यात आलं होतं. या पोस्टरमुळे तळकोकणातील राणे विरूद्ध शिवसेना वाद मुंबईतही पेटण्याची शक्यता बोलली जोत होती.

महत्वाच्या बातम्या-

जास्त झाली??? हॅंगओव्हर उतरवण्यासाठी ‘हा’ उपाय करा

गब्बर इज बॅक! रोहित शर्मा संघाबाहेर, ‘हा’ असणार भारताचा नवा कर्णधार

बँकेची कामं आटोपून घ्या! पुढील महिन्यात बँका 16 दिवस बंद, पाहा तारखा

राज्यात कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासात रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ

आता थांबायचं नाय! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा