आता ऐन थंडीतही पावसाची हजेरी; हवामान खात्याचा इशारा

मुंबई | सध्या राज्यात सगळीकडे थंडीची लाट सुरु आहे. महाराष्ट्रात सगळीकडे थंडीचं वातावरण असतााना मात्र काही ठिकाणी अजूनही पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ऐन थंडीतही पावसानं काही ठिकाणी हजेरी लावली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात 12 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणी संलग्न मराठवाडा भाग प्रभावीत असण्याची शक्यता. काही ठिकाणी हलका पावसाची शक्यता.

राज्यात पावसानं विश्रांती घेतली होती मात्र ऐन दिवाळीत पुन्हा काही ठिकाणी पावसनं हजेरी लावली. थंडीत पाऊस पडत असल्यानं आता तर कडाक्याची थंडी अजूनच वाढली आहे. आता पावसासोबतच थंडीचाही जोर वाढण्याचाी शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्यास सांगितलं जात आहे.

मान्सून ब्रेक झाल्यानं परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला होता. त्यामुळे वातावरणात खूप बदल झालेले पहायला मिळाले. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे.

वातावरणातील बदलामुळे महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर पूर्व परिसरात हवेचा दाब वाढल्याने राज्यात किमान तापमानात बरीच घट झाली आहे.

दिवाळीतही पाऊस पडत असल्यानं शेतकरी चिंतेत गेले होते. आता थंडीतही पाऊस पडत असल्यानं आता त्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. यंदा फक्त राज्यातच नाही तर एकूण देशभरातला हिवाळा एरवीपेक्षा जास्त थंड असेल असा अंदाज हवामान तज्ज्ञ वर्तवत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तर भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. पुण्याच्या भागात पहिल्यांदाच 10 डिग्रीपेक्षा कमी घसरलं होतं. हा प्रभाव 1-2 दिवस राहण्याची शक्यता आहे, असंही हवामान खात्याकडून सांगितलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  “कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या, लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी”

 “राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”

“भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, आम्ही जाब विचारणार” 

हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद