मुंबई | भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगणा रनौतने एका कार्यक्रमात उधळली आहेत. कंगणाच्या या वक्तव्यानंतर देशभरातून तिचा निषेध करण्यात येत आहे.
कंगणाच्या या वक्तव्यावर मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गता है मोहतरमा मलाणा क्रिम लेकर ज्यादा बोल रही है, ओव्हर डोस ज्यादाही हो गया है, अशी बोचरी टीका नवाब मलिकांनी केली आहे.
कंगनाचा पद्मश्री काढून घ्या, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. तसेच या अभिनेत्रीने कोरोडो भारतवासियांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांना अटक करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीये.
1857 पासून या देशात स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं. त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. गांधींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काही तरी बोलत आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री मागे घेतला जावा, असं त्यांनी म्हटलं आहे.
कंगणाच्या वक्तव्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांनी कंगणावर तसेच भाजपवर सडकून टीकास्त्र सोडलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असं वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी, असं राऊतांनी म्हटलंय.
कंगणाचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असं संजय राऊतांनी म्हटलंय.
दरम्यान, कंगणाला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. भाजप नेते वरून गांधी यांनी देखील कंगणावर टीका केली आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ शेअर करत तिच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“कंगनाबेनला दिलेले पुरस्कार परत घ्या, लाज लज्जा असेल तर तिने देशाची माफी मागावी”
‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखांचे बनले 1 कोटी
“राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”
“भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, आम्ही जाब विचारणार”
हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद