“खरं म्हणजे, शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांकडून असं…”

मुंबई | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांनी स्वत: विदर्भाचा कार्यक्रम हाती घेतलेला दिसत आहे. अशातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाया गडगडताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून विदर्भातील राष्ट्रवादीचा प्रभावी चेहरा म्हणून अनिल देशमुख यांना ओळखण्यात येतं. त्यामुळे आता राष्ट्रवादी सध्या विदर्भात पाय पसरायचा प्रयत्न करत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच चार दिवसीय विदर्भ दौरा केला आहे. यात त्यांना प्रकर्षानं अनिल देशमुख यांची आठवण झाल्याचं त्यांच्या बोलण्यातून पहायला मिळालं आहे.

अनिल देशमुख यांच्याबद्दल बोलताना शरद पवार भावूक झाल्याचं पहायला मिळालं आहे. अनिल देशमुख यांना भाजपकडून त्रास देण्यात आल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. मी जेव्हाही विदर्भात आलो तेव्हा अनिल देशमुख माझ्यासोबत होते पण ही पहिलीच वेळ आहे की अनिल देशमुख माझ्यासोबत नाहीत, असं भावनिक वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.

अनिल देशमुख यांना देण्यात आलेल्या त्रासाचा हिशोब अनिल देशमुख आल्यानंतर वसूल करणार असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर टीका केली आहे.

मला असं वाटत आहे, राष्ट्रवादी पक्षाची अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे त्यांना अशी भूमिका घेणं गरजेचं असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

शेवटी शरद पवार हे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना अशी भूमिका घ्यावी लागते. खरं म्हणजे, शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांकडून असं अपेक्षितच नाही, अशी खरमरीत टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

जी घटना अमरावतीमध्ये झाली होती ती आधीच्या दिवशी झालेल्या मोर्चामुळे झाली होती. त्या मोर्चावेळी तोडफोक करण्यात आली होती. त्यावेळी हिंदूंची दुकानं फोडण्यात आली होतं, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

सेक्युलर यावर का बोलत नाही, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे प्रश्न काय आहे आणि तो प्रश्न कोणी निर्माण केलाय, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

हिवाळ्यात अवकाळी! पुढील 5 दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मोदींची डोकेदुखी वाढणार! आता सीएए-एनआरसी आंदोलन दिल्लीत धडकण्याची शक्यता

 “संजय राऊत निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो”

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ