हिवाळ्यात अवकाळी! पुढील 5 दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | राज्यात पावसाला (Monsoon) ब्रेक मिळाल्यानंतर परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला होता. त्यामुळे वातावरणात खूप बदल झालेले पहायला मिळालं. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे.

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. दक्षिणेकडे कमी दाबाचे पट्टे निर्माण झालं होतं. त्यामुळे जोरदार पाऊस झाल्याचं दिसून आलं होतं. त्यापाठोपाठ अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे.

त्याचा परिणाम आता राज्यातील मान्सूनवर दिसून येत आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या अनेक भागात विजेच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

25 नोव्हेंबरपर्यंत राज्यात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडणार अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे वारे वाहत आहेत.

या वाऱ्यांचा परिणाम देखील राज्यातील पाऊसावर होत आहे. अरबी समुद्राच्या मध्यपूर्वी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसात पावसाचा परिणाम दिसून येतोय.

पुणे, सातारा, सांगली, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर या 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांना देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर पावसाने धुमाकूळ घातलं आहे. आंध्रप्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

या अवकाळी पावसामुळे शेतऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान होत आहे. गेले दोन दिवस राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. कोकण भागात चांगला पाऊस झाला. तर किनारपट्टी भागात वादळी वारे वाहताना देखील दिसत आहे.

दरम्यान, राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत आहे. आताही थंडीचा ऋतू असला तरी हवामानातील बदल काही थांबण्याचं नाव घेत नाही.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोदींची डोकेदुखी वाढणार! आता सीएए-एनआरसी आंदोलन दिल्लीत धडकण्याची शक्यता

 “संजय राऊत निम्मे डॉक्टर, त्यांनी माझी मानसिकता तपासावी, मी त्यांचं डोकं तपासतो”

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ

“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला”