कोरोनाग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी दिलं तीन महिन्यांचं वेतन

भुवनेश्वर | ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपलं तीन महिन्यांचं वेतन कोरोनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीत आपलं वेतन जमा केलं आहे.

नवीन पटनायक यांनी आपलं तीन महिन्यांचं वेतन मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिलं आहे. करोनासारख्या आजाराचा सामना करणाऱ्यांसाठी मदत म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त असामान्य परिस्थितीत सर्वांचा प्रतिसाद मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.

ओडिशामध्येही पाच जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं होतं. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी 5 ऐवजी 14 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, ज्यांना होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले आहेत त्यांच्या घरांवरही शिक्के मारण्याचा निर्णय ओडिशा प्रशासनानं घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली

-चिंताजनक | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार; पुण्यात आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह

-शाहीनबाग आंदोलनावर अखेर पोलिसांची कारवाई; सर्व आंदोलकांना हटवलं

-पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 18 रुपये तर डिझेलच्या 12 रुपयांची वाढ

-मध्य प्रदेशात सत्तापालट; शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी विराजमान