महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली

पुणे | महाराष्ट्रात कोरोनाची सर्वात अगोदर लागण झालेल्या दाम्पत्याची प्रकृती ठणठणीत झाली आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. याबाबत पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात 9 मार्च रोजी पहिले दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. हे दोघं रुग्ण पती-पत्नी होते. ते वीणा ट्रॅव्हल्समार्फत 1 मार्चला दुबईवरुन आले होते.

6 मार्चपर्यंत त्यांना कोणतेही लक्षणं दिसली नाहीत. मात्र 9 मार्च रोजी पत्नीला कोरोनाची लक्षणं जाणवायला लागले. म्हणून त्यांनी तपासणी केली. दोघांचीही रक्त तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटीव्ह निघाले. यानंतर तातडीने त्यांना पुण्याच्या नायडू रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करुन उपचार सुरु केले होते.

दरम्यान, या दाम्पत्यावर 13 ते 14 दिवस उपचार केल्यानंतर आज अखेर या रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याचं समोर आलं आहे. या दोघी रुग्णांच्या रक्त तपासणीत कोरोना निगेटीव्ह असल्याचं समोर आलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-चिंताजनक | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या शंभरीपार; पुण्यात आणखी 3 रुग्ण पॉझिटिव्ह

-शाहीनबाग आंदोलनावर अखेर पोलिसांची कारवाई; सर्व आंदोलकांना हटवलं

-पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 18 रुपये तर डिझेलच्या 12 रुपयांची वाढ

-मध्य प्रदेशात सत्तापालट; शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्रिपदी विराजमान

-“आता रस्त्यांवर फिरणाऱ्यांची गय करणार नाही… सगळं तुमच्यासाठीच चाललंय एवढंही कळू नये”