रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट चांगलंच भोवलं, भाजप नेत्याची सहा तास चौकशी

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्यानं भाजपच्या नेत्याला चांगलंच भोवलं आहे. सध्या त्यांच्या ट्विटनं राज्यात चांगलीच खळबळ माजवली आहे.

भाजप नेते जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी एक वादग्र्सत ट्विट केलं होतं. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ताब्यात घेतलं होतं.

गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’, असे म्हटले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राज्यातील शिवसैनिकांनी तर आक्रमक पवित्रा घेतलेला पहायला मिळत आहे.

रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांची मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सहा तास कसून चौकशी केली.

या ट्वीटसोबतच जितेन गजारिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधातही आक्षेपार्ह ट्वीट केलं. त्यामुळे गजारिया यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

जितेन गजारीया यांच्यावर कोणते कलम लवण्यात आलेत हे अजून स्पष्ट झालेले नाहीय. पण जितेन गजारिया यांच्या विरोधान शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला आहे.

जितेन गजारिया यांनी केलेली दोन्ही ट्विट ही कायद्याच्या चौकटीत आणि सभ्य भाषेतील आहेत. त्यामध्ये कोणत्याही आक्षेपार्ह भाषेचा वापर केलेला नाही. त्यामुळे आम्ही यापुढेही सभ्य भाषेत राजकीय ट्विट करत राहू, असं गजारियाच्या वकिलांनी म्हटलं आहे.

रश्मी ठाकरे यांना ‘राबडीदेवी’ म्हटले, तर काय झाले? राबडीदेवी या बिहारच्या मुख्यमंत्री होत्या. मग रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी म्हणण्यात काय चूक आहे, असा प्रश्नही जितेन गजारिया यांच्या वकिलांनी केला आहे.

दरम्यान, जितेन गजारीयांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. तसेच गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाकडेही त्यांनी पत्र पाठवून तक्रार केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

  मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती, राजेश टोपे म्हणाले…

  ‘तिसरी लाट सौम्य असण्याची शक्यता, मात्र…’; तज्ज्ञांचा इशारा

  चिमुकल्याच्या हुशारीमुळे वाचला आईचा जीव, आई बेशुद्ध झाल्यावर केलं असं काही की…

बापरे! राज्यात कोरोनाचा धुमाकूळ, गेल्या 24 तासात रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ

मुंबईत लाॅकडाऊनची शक्यता! कोरोना रूग्णसंख्येनं ठरलेला ‘तो’ आकडा ओलांडला