‘कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं काम करु नका’; ‘त्या’ ट्विटवरुन चंद्रकांत पाटलांचा इशारा

मुंबई | भाजप नेते जितेन गजारिया (Jiten Gajaria) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टविटनं राज्यात चांगलीच खळबळ माजवली आहे.

गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांना ‘मराठी राबडीदेवी’, असे म्हटले आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राज्यातील शिवसैनिकांनी तर आक्रमक पवित्रा घेतलेला पहायला मिळत आहे. अशातच आता याप्रकरणी राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिसाद उमटत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. रश्मी ठाकरे यांच्यावर ट्विट करणाऱ्या जितेन गजारिया यांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करुन पोलीस योग्य ती कारवाई करतील. मात्र यानिमित्ताने मी भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कोणाच्याही भावना दुखावल्या जातील असं काम करु नका, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

गजारिया यांनी रश्मी ठाकरे यांच्याविषयी केलेल्या ट्विटवर त्यांची मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने सहा तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडलं.

रश्मी ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका करण्यात आली. त्यामुळे सध्या वतातावरण चांगलंच तापलं आहे.

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या प्रकारामुळे चांगलेच आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यात येत आहे.

पोलिसांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही त्यांना करू मात्र ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप जितेन गजारिया याच्या वकील यांनी केला आहे.

दरम्यान, जितेन गजारीयांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. तसेच गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाकडेही त्यांनी पत्र पाठवून तक्रार केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह ट्विट चांगलंच भोवलं, भाजप नेत्याची सहा तास चौकशी

  मुंबई लोकलबाबत महत्त्वाची माहिती, राजेश टोपे म्हणाले…

  ‘तिसरी लाट सौम्य असण्याची शक्यता, मात्र…’; तज्ज्ञांचा इशारा

  चिमुकल्याच्या हुशारीमुळे वाचला आईचा जीव, आई बेशुद्ध झाल्यावर केलं असं काही की…

बापरे! राज्यात कोरोनाचा धुमाकूळ, गेल्या 24 तासात रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ