अबब… सोनं आतापर्यंत 9 हजार रुपयांनी स्वस्त; तज्ज्ञांनी दिलाय धक्कादायक इशारा

गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या दरात घसरण सुरु आहे. भारतात सर्वात जास्त सोनं खरेदी केलं जातं. सोनं प्रति 10 ग्रॅम 220 रुपयांनी घटले आहे. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा दर 47,380 रुपयांवर सुरू आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्ली गुरूवारी सोन्याचा भाव 232 रुपये प्रति 10 ग्रॅम घट दिसून आली आहे.

येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमती आणखी खाली होऊ शकतात. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 42 हजार रुपयांपर्यंत घसरू शकते. लोक सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने विकत घेण्यास फारसा रस दाखवत नाहीयेत.

जगभरातील बडे गुंतवणूकदार आणि इतर केंद्रीय बँकांचे लक्ष लागले आहे. आर्थिक अनिश्चितता हळूहळू निवळत असल्याने सोन्यातील तेजीला ब्रेक लागला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे.

अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घोषित करताच सोन्याच्या दरात तब्बल 1500 रुपयांची घट झाली आहे. ग्राहकांना सोनं खरेदी करण्यासाठी प्रती तोळ्यामागे आता 48 हजार 123 रूपये मोजावे लागणार आहेत.

चांदीच्या किमतींमध्ये अजूनही चढउतार कायम आहे. यामागील औद्योगिक मागणीत तेजी आहे. कमोडिटी मार्केटमधील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर जगातील आर्थिक घडामोडी अशाच प्रकारे चालू राहिल्या, तर येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी घसरण येऊ शकते.

महत्वाच्या बातम्या –

शिल्पा शेट्टीचे अक्षय कुमारवर अत्यंत धक्कादायक आरोप, व्हिडीओ व्हायरल

सुंदर दिसण्याच्या नादात ‘या’ अभिनेत्रीनं नाकाची लावली वाट; एकदा पहाच

बाॅलीवूडमध्ये येण्यापूर्वी अभिषेक बच्चन करायचा ‘हे’ काम; जाणून घ्या, अभिषेकच्या करिअरविषयी

जाणून घ्या तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

कोरोनाचा असाही परिणाम; 2020 वर्षात झाले सर्वाधिक ब्रेकअप