जे करायला नको तेच केलं; महाराजावर गुन्हा दाखल

उमरगा | उमरगा तालुक्यातील ओलूरमधील वीरशैव लिंगायत मठाच्या महाराजांवर मुरुम पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेच्या विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सुशांत शिवाचार्य असं या महाराजांचं नाव आहे.

महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी गावातील मठात दर्शनासाठी गेली होती. यावेळी मठाचे महाराज सुशांत शिवाचार्य यांनी त्या महिलेचा हात वाईट हेतूने धरुन खोलीमध्ये ओढल्याची तक्रार संबंधित महिलेने केली असल्याची माहिती समोर आली आहे.

संबंधित महिलेने घडला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर काही जण शिवाचार्यांना जाब विचारण्यासाठी गेले त्यावेळी शिवाचार्यांनी मुरुम पोलीस स्टेशनमध्ये काही जणांविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणी शिवाचार्यावर संबंधित लोकांनी विनयभंगाची तक्रार दाखल केली.

दरम्यान, आलूरच्या मठाचा मठाधिपती होण्यासाठी दोन गटात वाद आहे. या वादातून मठाधिपती असलेल्या सुशांत शिवाचार्य महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचा आरोप काही लोक करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सुट्टी नाहीच!

-#CoronaVirus I ‘त्या’ 11 जणांना बाहेर न पडण्याच्या सूचना

-#Corona | स्वत:च डोकं वापरुन औषध घेऊ नका; अजित पवारांचं आवाहन

-#Corona I परदेशातून आलेल्या कुटुंबाला स्वत:च्याच घरात जाण्यापासून रोखलं अन् पुढे…

-कोरोना गो नाही तर कोरोना या असं म्हणू का?; आठवले टीकाकरांवर संतापले