राणा जगजितसिंह यांच्या पक्षांतरावर ओमराजे म्हणातात…

उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांनी शनिवारी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करण्याची घोषणा केली. यावर उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विरोध केला आहे.

राणा जगजितसिंह पाटील कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांना माझा कायम विरोधच असेल. राणा जगजितसिंह पाटील यांचं कुटुंबीय सामान्य जनतेच्या विश्वासाला जागले नाहीत. ज्या शरद पवारांनी त्यांना पद दिलं त्या पवारांचे हे होऊ शकले नाहीत. याचा भाजपच्या नेत्यांनी याचा विचार करावा, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटल आहे.

राणा जगजितसिंह यांचे राजकारण इथले मतदार संपवणार आहेतच पण मीही त्यांच राजकारण संपवणार, असं मत ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह यांच्यावरुन आता शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान,  माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह यांनी शनिवारी उस्मानाबाद येथे समर्थकांच्या मेळाव्यात भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या-