आजी कर्णधाराने माजी कर्णधाराला दिल्या खास शुभेच्छा; विराट कोहली म्हणाला…

मुंबई | भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी आणि सर्वात कूल कॅप्टन पण एक आक्रमक फिनिशर म्हणून धोनीची ओळख संपुर्ण क्रिकेटविश्वात होती. मात्र माहीने आज अचानक निवृत्ती घेतल्याने सर्व चाहते निराश झाले.

धोनी 2022 चा विश्वकप खेळणार असं बोललं जात होतं. परंतू धोनीने अचानकपणे आज निवृत्ती जाहीर केली. अनेक खेळाडूंनी त्याला पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही धोनीला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रत्येक खेळाडूला एक दिवस निवृत्त व्हायचं असतं परंतू तू देशासाठी दिलेलं योगदान हे नेहमी आठवणीत राहणार असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. यासंदर्भात विराट कोहलीने ट्विट केलं आहे.

दरम्यान, तुझ्यासोबत 2011 चा विश्वचषक जिंकणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात संस्मरणीय क्षण होता. तुझ्या दुसऱ्या इनिंगसाठी तुला शुभेच्छा, अशा शब्दात क्रिकेटच्या देवाने सचिन तेंडुलकरला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

”तो’ क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात संस्मरणीय क्षण होता’; माहीच्या निवृत्तीवर सचिनंचं भावूक ट्विट

ही दोस्ती तुटायची नाय! धोनीपाठोपाठ सुरेश रैनानेही घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

अखेर तो थांबला! महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

“ज्यांनी पाच वर्ष गृह खातं सांभाळलं त्यांनाच पोलिसांवर विश्वास नाही हे दुर्दैवी”

सुशांतच्या कार्याचा गौरव करत कॅलिफोर्नियानं सुशांतला दिला मरणोत्तर पुरस्कार