झेंडा मागे मग सॅल्यूट कोणाला मारतायत मुख्यमंत्री, समोर सीबीआय दिसली की काय?- निलेश राणे

मुंबई |  सध्या सुशांत सिंह प्रकरणावरून राणे पिता पुत्रांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलं आहे. काल भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय बंगल्यावर म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर ध्वजारोहन केलं. यावेळी त्यांच्यासह त्यांच्या धर्मपत्नी रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. ठाकरेंनी ध्वजारोहनाचा फोटो ट्विट केला होता. मात्र यावरूनही भाजप नेते निलेश राणे यांनी सुशांत प्रकरणाचा धागा पकडत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

झेंडा मागे मग सल्यूट कोणाला मारतायत मुख्यमंत्री, समोर साबीआय दिसली की काय?, असा सवाल निलेश राणेंनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहनाचा जो फोटो ट्विट केला होता. त्यावरून राणेंनी उद्धव ठाकरेंना असा उपहासात्मक सवाल केला आहे. यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून पाठवणार आहेत. त्यामळे भाजपने सुशांतचं प्रकरण इतकं लावून धरलं असल्याचा आरोप राज्य सरकारमधील नेत्यांनी केला आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

आजी कर्णधाराने माजी कर्णधाराला दिल्या खास शुभेच्छा; विराट कोहली म्हणाला…

”तो’ क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात संस्मरणीय क्षण होता’; माहीच्या निवृत्तीवर सचिनंचं भावूक ट्विट

ही दोस्ती तुटायची नाय! धोनीपाठोपाठ सुरेश रैनानेही घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

अखेर तो थांबला! महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

“ज्यांनी पाच वर्ष गृह खातं सांभाळलं त्यांनाच पोलिसांवर विश्वास नाही हे दुर्दैवी”