फडणवीसांचा पुन्हा काँग्रेसला धक्का; उद्या या नेत्यांची भाजपमध्ये मेगाभरती!

मुंबई |  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये काही नेत्यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे अगदी विधानसभेच्या तोंडावर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लब इथं ही मेगाभरती पार पडणार असल्याची माहिती मिळतीये.

अस्लम शेख, सोलापूरमधून सिद्धराम मेहेत्रे आणि भारत भालके, राहुल बोंद्रे, काशिराम पावरा, डी.एस. आहिरे या नेत्यांची नावं आहेत.

आचारसंहिता लागल्यानंतर भाजपमधल्या उमेदवारांच्या प्रवेशाची संख्या कमी होईल असं म्हटलं जात होतं. मात्र, अजूनही अनेक नेते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास उत्सूक आहेत. भाजपशी संपर्कात असल्यामुळे काही नेत्यांना काँग्रेसमधून उमेदवारीसाठी डच्चू दिला जाईल अशी चर्चा होती आणि त्यामुळेच हे नेते आता सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 51 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. कॉंग्रेसचे सचिव मुकुल वासनिक यांनी ही यादी जाहीर केली आहे. 

महत्वाच्या बातम्या-