“सावरकरांचा अपमान करणाऱ्या बाईला केतकी चितळेसारखी अटक होणार का?” – अभिनेते शरद पोंक्षे

मुंबई | मराठी सिनेअभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे समाज माध्यमांवर (Social Media) नेहमीच सक्रिय असतात. ते त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यातून आणि भाषणातून चर्चेत आणि कधी वादाच्या भोवऱ्यांत असतात.

आता पुन्हा एकदा त्यांनी तशाच प्रकारचे एक वक्तव्य केले आहे. त्यांची सध्या एक समाज माध्यमावरील पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात एका महिलेने सावरकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. ते तिचा निषेध करत आहेत.

त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एका महिलेने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर (V. D. Savarkar) यांच्यावर केलेले आरोप खोडून काढण्याचा आणि तिच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला आहे.

कोणताही पुरावा नसताना सावरकरांना बदनाम केले जाते आहे. असे पोंक्षे यांनी पोस्टला शीर्षक दिले आहे. यात मोना आंबेगावकर नामक एका बाईंनी सावरकारांवर बलात्काराचे आरोप केले आहेत.

या पोस्टमध्ये पोंक्षे म्हणातात, सावरकरांच्या विरोधात कोणताही पुरावा नसताना अपमान केला जात आहे. तसेच मी या मोना बाईचा निषेध करतो. तिला सुद्धा केतकी चितळे सारखे तुरुंगात टाकणार का? असा त्यांनी प्रश्न विचारला आहे.

सुजाता आनंदन यांनी एक पोस्ट केली होती. त्याला मोना आंबेगावकर यांनी दुजोरा दिला होता. यात छत्रपती शिवाजी महाराज्यांचा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या प्रसंगाचा हवाला देत भाष्य केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्यासमोर त्यांच्या मावळ्यांनी कल्याणचा सुभेदार मुलाणा हयाती याची हत्या करुन त्याच्या सुंदर आणि देखण्या सुनेला हजर केले होते.

त्यानंतर शिवाजी महाराजांनी तिची सन्मानपूर्व साडीचोळी देऊन परत पाठवणी केली. तो प्रसंग शिवचरित्रात अमर आहे. पण सावरकरांनी त्यावर आक्षेप घेतला आणि शिवाजी मुर्ख होता, त्याने तिचा बलात्कार करायला हवा होता, असे मत सावरकरांनी मांडल्याची पोस्ट सुजाता आनंदन यांनी केली होती.

त्याच पोस्टवर आपली प्रतिक्रिया देत मोना आंबेगावकर यांनी, सावरकरांवर यांनी 1908 साली मार्गरेट लावरेन्स (Margaret Lawrence) नावाच्या महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावर त्याचा खटला चालविला गेला होता. त्यांनी त्यावेळी आपला गुन्हा कबूल केला होता आणि त्यांनी चार महिन्यांची शिक्षा देखील झाली होती, अशा आशयाची कमेंट केली.

महत्वाच्या बातम्या –

सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार?, अशोक गहलोत म्हणाले

“… नाहीतर मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनला आग लागेल.”, जितेंद्र आव्हाडांनी दिला गंभीर इशारा

“अरे हाड, वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे, हमने उनको धक्काबुक्की किया!”

“आम्ही काही केलं की तो घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं…” धनजंय मुंडे यांची विधानसभेत बॅटिंग

शिंदे गट कमळावर निवडणुका लढणार? वाचा सविस्तर