सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार?, अशोक गहलोत म्हणाले

नवी दिल्ली | काँग्रेस (INC) पक्षात नवीन अध्यक्ष निवडण्यची प्रक्रिया सध्या जोर धरत आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Soniya Gandhi) ह्या अध्यक्ष पदावर राहणार की नाही, हा मुद्दा सध्या गुलदस्त्यात आहे.

याच पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यांना काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष बनविणार असल्याचे वृत्त होते. पण त्यांनी ते फेटाळले आहे.

काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी आपल्यावर जबाबदारी टाकली असून आपण त्याच्यासोबत कोणत्याही परिस्थित प्रातारणा करणार नाही. मला माध्यमांच्याकडूनच ही माहिती मिळत आहे, असे गहलोत म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, काँग्रेस पक्षाने माझ्यावर काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. त्यात त्यांनी माझ्यावर गुजरातमधील निवडणुकीत निरीक्षक म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी सोपविली आहे.

तसेत राजस्थानमधील माझ्या कर्तव्यांसोबत मी एकनिष्ठ आहे आणि त्यात मी कोणतीही तडजोड करणार नाही. इतर सर्व गोष्टी मला बाहेरुन कळत आहेत, असे देखील गहलोत म्हणाले.

यापूर्वी गहलोत यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील त्यांना हंगामी अध्यक्ष करणार असल्याची चर्चा होती. तरी अद्याप त्यांच्या नावाची कोणतीही घोषणा झालेली नाही.

अध्यक्ष पदासाठी अशोक गहलोत यांच्या नावाला प्राधान्य असल्याचे म्हंटले जात आहे. परंतु गहलोत स्वत: ते स्वीकारण्यास उत्सुक नाहीत, असे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या –

“… नाहीतर मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनला आग लागेल.”, जितेंद्र आव्हाडांनी दिला गंभीर इशारा

“अरे हाड, वो क्या हमको धक्काबुक्की करेंगे, हमने उनको धक्काबुक्की किया!”

“आम्ही काही केलं की तो घोडेबाजार आणि तुम्ही काय केलं…” धनजंय मुंडे यांची विधानसभेत बॅटिंग

शिंदे गट कमळावर निवडणुका लढणार? वाचा सविस्तर

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांत मारामारी; नेमके कारण जाणून घ्या