हजाराच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल फ्री! ‘या’ व्यापाऱ्याची ऑफर

मुंबई| अलिकडे काही वर्षांमध्ये पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. सोशल मिडियावर देखील वाढत्या दरांवरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुंबईतील उल्हासनगरच्या एका व्यापाऱ्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे. उल्हासनगरमध्ये असलेल्या शितल हँडलूम या दुकान मालकाने 1000 रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल मोफत देण्याची नवी आॅफर आणली आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक लोकांचे काम बंद पडले असून त्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. यातच उल्हासनगरच्या शिरु चौकात असलेल्या शीतल हँडलूम हाऊसचे मालक ललित शिवकानी यांनी इंधन दरवाढीचा फटका सर्वांनाच बसत असतानाच्या पार्श्वभूमीवर 1000 रुपयांच्या खरेदीवर एक लिटर पेट्रोल मोफत देण्याची भन्नाट कल्पना आणली आहे. ललित शिवकानी यांनी केलेल्या या घोषणेची संपूर्ण उल्हासनगरमध्ये चर्चा सुरू आहे

शीतल हँडलूम या दुकानात चादरी आणि पडदे विकले जातात. सध्याच्या परिस्थितीत बाजार थंड असल्यानं या दुकानाचे मालक ललित शिवकानी यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ही आगळीवेगळी भन्नाट अशी आॅफर आणली आहे. यासाठी 17 सेक्शनच्या एचपी पेट्रोलपंपासोबत दुकानमालकाने टायअप केलंय.

ग्राहकांना मिळालेले पेट्रोलचे कुपन एचपी पंपावर दिल्यानंतर 100 रुपयांचे पेट्रोल गाडीमध्ये भरून दिले जाते. आत्तापर्यंत अनेक नवनवीन शक्कल लढवून दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. पण अशी पेट्रोल मोफत देण्याची ऑफर पहिल्यांदाच ऐकायला मिळाली आहे.

गेल्या तीन दिवसात 28 ग्राहकांनी 1 हजारापेक्षा जास्त खरेदी करत हे कुपन मिळवलंय. त्यामुळे खरेदी आणि पेट्रोल असा दुहेरी फायदा ग्राहक घेतायत. या अनोख्या आयडियाला ग्राहकांमधूनही चांगला प्रतिसाद मिळतोय.

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवर सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा ब्रेक लावला आहे. गेल्या महिन्यात अनेक वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यात आल्या. यामुळे, दोन्ही इंधनाचे दर प्रत्येक शहरात ऑल टाइम हाय गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

आज सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, पाहा काय आहेत भाव

कोरोनाची लस घेताना पो.लिसाला आवरेना…., पाहा व्हिडीओ

धमाकेदार ऑफर! 1.45 लाखांची ‘ही’ बाईक खरेदी करा फक्त 45 हजारात…

सुक्या मेव्यातील अक्रोड आहे आरोग्यदायी, जाणून घ्या ‘हे’ फायदे

“मोदी सरकारने मराठा समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे”