‘सगळी सोंग आणता येतात, पण…’; अजित पवारांच शिवसेनेच्या सामनातून तोंडभरुन कौतुक

मुंबई | राजाचे अर्थसंक्लपीय अधिवेशन झाले आहे. यावरुन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये आ.रोप-प्रत्यारोपांची खेळी रंगलेली पाहायला मिळत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास सरकारचा दुसरा अर्थसंक्लप सादर केला.

सादर केलेल्या अर्थसंक्लपांमुळे अजित पवारांचे शिवसेनेच्या सामन्यामधून खूप कौतुक केलं आहे. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही, याचे भान ठेवत अजित पावारांनी राज्यातील सर्व विभागांचा, विविध क्षेत्र आणि घटकांचा साकल्याने विचार करुन एक सर्वसमावेशक आणि समतोल म्हणावा असा अर्थसंकल्प सादर केला, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

एककीडे सव्वा वर्षापासून असलेलं कोरोनाचे संकट. लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या बाजारपेठा, व्यापार-उद्योग एकूण अर्थव्यवस्थेचा झालेला कोंडमारा. चारही बाजूने संकटांचे आव्हान असताना अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे, हे तसं जिकिरीचेच काम होते. मात्र तरीदेखील अर्थमंत्र्यांनी महाविकास आघाडीला चालना देणार दुसरा अर्थसंकल्प मांडला, त्याबद्दल ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहे.

अर्थसंकल्पावर टी.का करणे हे विरोधकांचे काम आहे. त्यामुळे ते त्यावर कितीही टीका करत असले, तरी एकंदरीत अर्थसंकल्पातील तरतूदी पाहता अर्थसंकल्पात जागोजागी राज्यातील महत्वाच्या घटकांना काही ना काही देण्याचाच प्रयत्न केला असल्याचं दिसत आहे.

तसेच अनेक अंतर्गत आव्हानं येऊनही रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर घेणारा असल्याचंही अग्रलेखात म्हटलं आहे.

मद्यावरील तेवढी एक कारवाई वगळता इतर कुठलीही मोठी करवाढ न करता राज्यातील शहरी व ग्रामीण जनतेला संपूर्ण न्याय देणाचा प्रयत्न या अर्थसंकल्पात कसोशीने प्रयत्न करण्यात आला आहे.

दरम्यान, बळीराजासाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने. विकेल ते पिकेल या योजनेसाठी 2100 कोटी रुपये, 42 हजार कोटींचे पीक देण्याचे उद्दिष्ट. त्याचप्रमाणे थकित वीजबिलामध्ये 33 टक्क्यांची सूट असे एक ना अनेक शेतकरी हिताचे निर्णय अर्थसंकल्पात ठळकपणे दिसतात.

तसेच हे आपले सरकार आहे. ही भावना शेतकऱ्यांच्या मनात रुजविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न करत असल्याचंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाची लस घेताना पो.लिसाला आवरेना…., पाहा व्हिडीओ

धमाकेदार ऑफर! 1.45 लाखांची ‘ही’ बाईक खरेदी करा फक्त 45 हजारात…

सुक्या मेव्यातील अक्रोड आहे आरोग्यदायी, जाणून घ्या ‘हे’ फायदे

“मोदी सरकारने मराठा समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे”

….म्हणून आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ प्रदर्शापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात…!