मुंबई | 2020 हे वर्ष बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी अतिशय दुःखद ठरलं आहे. अनेक दिग्गज लोकांनी या वर्षात जगाचा निरोप घेतला आहे. मनोरंजन विश्वात अनेक धक्कादायक घटना यावर्षी घडल्या आहेत, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच आता बॉलिवूड इंडस्ट्रीतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
बॉलिवूड अभिनेता आसिफ बसरा यांनी आज आ.त्मह.त्या केली आहे, अशी बातमी आता समोर आली आहे. कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा येथे मॅक्डोलगंज हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. मॅक्डोलगंज येथील जोगीबाडा रोडवर असणाऱ्या एका कॅफेमध्ये आसिफ बसरा यांचा मृ.तदेह आढळला आहे. आसिफ बसरा हे 53 वर्षाचे होते.
बॉलिवूड मधील आणखी एक दिग्गज नेता अशाप्रकारे सर्वांना सोडून गेल्यानं इंडस्ट्रीतील अनेकांना चांगलाच धक्का बसला आहे. बॉलिवूड मधील अनेक कलाकारांना आसिफ बसरा यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
आसिफ बसरा यांचा मृ,तदेह एका कॅफेमध्ये सापडल्याची माहिती मिळताच मध्य प्रदेश पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी आसिफ यांचा मृ,तदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे. आसिफ बसरा यांच्या मृ,त्यूचं ठोस कारण अद्याप समजलं नसलं तरी आसिफ यांनी नैराश्यातून आ,त्मह.त्या केली असल्याचं प्राथमिक तापसात समोर आलं आहे.
गेल्या 5 वर्षांपासून आसिफ बसरा मॅक्डोलगंजमध्ये एका विदेशी महिलेबर ‘लिव्ह इन रिलेशन’ मध्ये राहत होते. ते मॅक्डोलगंजमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. गुरुवारी दुपारी ते आपल्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी गेले होते. घरी आल्यानंतर त्यांनी कुत्र्याच्या दोरीलाच गळफा.स घेऊन आ.त्मह.त्या केली, अशी माहिती मिळाली आहे.
याप्रकरणी तपास करणारे एसपी विमुक्त रंजन म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आसिफ बसरा नैराश्याचा सामना करत होते. या नैराश्यातूनच त्यांनी गळफा.स घेवून आ.त्मह.त्या केली, असं प्राथमिक तापसात आढळलं आहे. पोलीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.
दरम्यान, आसिफ बसरा गेल्या कित्येक वर्षांपासून मनोरंजन विश्वात काम करत आहेत. अनेक टेलिव्हिजन सिरिअल्सच्या माध्यमातून ते घराघरात पोहचले होते. तसेच आसिफ बसरा यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी नेहमीच पसंती दिली आहे.
आसिफ बसरा यांनी ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटात देखील काम केलं आहे. त्यांनी या चित्रपटात इमरान हाश्मीच्या वडिलांची भूमिका केली होती. तसेच आसिफ बसरा यांनी ब्लॅक फ्रायडे, परजानिया या चित्रपटांत देखील काम केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अर्णव गोस्वामींचं थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन! म्हणाले खेळ तर आत्ता सुरु झालाय….
कंगनानं उलघडलं बॉलीवूडचं ‘ते’ काळं सत्य, सरकार सोबत अभिनेत्यांच्या बायकांवर गंभीर आरोप करत म्हणाली…
व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोमागचं सत्य सांगत शरद पवारांचा राज्यपालांवर निशाणा