Pune Vasant More l राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा निवडणुकीआधी पुण्यामध्ये जबरदस्त धक्का बसला आहे. मनसे वरिष्ठ नेते वसंत मोरे( Vasant More) यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या फोटोसमोर साष्टांग दंडवत घालत असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करत साहेब मला माफ करा असं कॅप्शन दिल आहे.
Pune Vasant More l वसंत मोरे वरिष्ठ नेत्यांवर नाराज :
गेल्या अनेक दिवसांपासून पक्षांतर्गत गटबाजीमुळे मनसेचे वरिष्ठ नेते वसंत मोरे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र वसंत मोरे यांनी राजीनामा दिला असला तरी देखील पुढे काय भूमिका घेणार हे अद्याप त्यांनी भूमिका स्पष्ट केलेल नाही.
वसंत मोरे हे पक्षातील काही दिग्गज वरिष्ठांवर नाराज असल्याची चर्चा मागील काही महिन्यांंपासून चांगलीच रंगली होती. त्याच कारणामुळे वसंत मोरे यांनी खदखद देखील व्यक्त केली होती. त्यांनी आज सकाळच्या वेळी ‘एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो’, अशा आशयाची पोस्ट केली होती. त्यानंतर अगदी काही तासातच वसंत मोरेंनी मनसेचा राजीनामा दिला आहे.
News Title : Pune Vasant More breaking News
महत्त्वाच्या बातम्या-
पुष्य नक्षत्रात खरेदी करा सोने-चांदी, वाहन, मालमत्ता; जाणून घ्या शुभ वेळ
…म्हणून बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण सिनेसृष्टीत यश मिळवू शकला
Credit Score खराब होण्यापूर्वी ‘या’ चुका टाळा; अन्यथा होऊ शकत मोठं नुकसान
CAA कायदा काय आहे? अन् त्याचा फायदा नेमका कोणाला होणार? जाणून घ्या सविस्तर
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल