“कशामुळे कंगनाचं डोकं बधीर झालं आहे याचा शोध समीर वानखेडेच घेऊ शकतात”

मुंबई | अभिनेत्री कंगना रणौतनं देशाविषयी मोठं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं नाही, तर ते भीक मागून मिळालं आणि जे स्वातंत्र्य मिळाले ते 2014 मध्ये मिळालं, असं कंगनानं एका कार्यक्रमावेळी म्हटलं होतं. आता तिच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे.

कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता राजकीय नेत्यांनी तिच्यावर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी तिच्या या वादग्रस्त वक्तव्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे देशभरातून तिच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता कंगनावर निशाणा साधला आहे. सामनातील अग्रलेखातून शिवसेनेनं कंगना रणौतच्या या विधानाचा समाचार घेत भाजपावर देखील निशाणा साधला आहे.

“कंगनाबेनचे हे भिकार वक्तव्य ऐकून गुजरातमधील सरदार पटेलांचा जगातला सर्वात उंच पुतळाही अश्रू ढाळत असेल”, असं सामना अग्रलेखातून म्हटलं आहे. कंगनानं तर भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सकळ्यांवरच अफू-गांचाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिगकारी ठरवलं आहे, असंही सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे.

कंगनाचं डोकं बधीर झालं आहे, असं वरुन गांधींनी म्हटलं आहे. आता कोणत्या कारणामुळे कंगनाचं डोकं बधीर झालं आहे याचा शोध एनसीबी अधिकारी समीर वानखेडेच घेऊ शकतात, असं म्हणत सामनातून कंगनावर निशाणा साधला आहे.

कंगना ही भाजपचं खुलेआम समर्थन करते. मात्र, पद्मश्री पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर तिनं स्वातंत्र्याबद्दल केलेल्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. त्यामुळे शिवसेनेनं आता सामनातून तिला लक्ष केलं आहे.

कंगनाच्या या विधानामुळे तिच्यावर अनेक टीका होताना दिसत आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. त्यामुळे कंगनाला अनेक टीकांचा सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगना राणौतला तिच्या वक्तव्यावरून खडेबोल सुनावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –  

  “भारत माता 70 वर्षे रडत होती, मात्र 2014 नंतर ती हसायला लागली”

  “एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात”

पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 

“कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही”

‘लस न घेतलेल्या नागरिकांना…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य