शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात अमित ठाकरेंना संधी?, भाजपची मनसेला स्पेशल ऑफर

मुंबई | शिंदे गटाच्या बंडाळीने महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. शिवसेना आमदारांचा मोठा गट एकनाथ शिंदेंसोबत फुटल्याने शिवसेना दुभंगली.

शिवसनेच्या बंडखोर आमदारांमुळे महाराष्ट्रात सत्तापालट झालं व भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. महाराष्ट्रात सत्तापालट होण्यामागे भाजपची महत्त्वाची भूमिका आहे.

महाविकास आघाडीतील धुसफूस लक्षात आली होती त्यामुळे नजर ठेवून करेक्ट कार्यक्रम केल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी देवेंद्र फडणवीस वेशांतर करून जात असल्याचा गौप्यस्फोट देखील अमृता फडणवीसांनी केला होता.

शिवसेनेला धक्का देत भाजपने कडवे शिवसैनिक देखील आपल्या बाजूने वळवले. तर शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने नवी खेळल्याची चर्चा सध्या रंगत आहे. भाजप आपल्या कोट्यातून मनसेला एक मंत्रिपद देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांचे नाव आघाडीवर असतानाअमित मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना शिंदे सरकारच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता आहे. अमित ठाकरेंना मंत्रिपद दिल्यास तरूण मतदारांवर प्रभाव पडू शकतो, असा भाजपचा अंदाज आहे.

अमित ठाकरे आमदार किंवा विधान परिषद सदस्य नाहीत. मात्र, शिवसेनेला शह देण्यासाठी ठाकरे कुटुंबातील कोणाकडे तरी मंत्रिपद देण्याचा भाजपचा विचार असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, राज ठाकरेंनी ही ऑफर धूडकावून लावल्याचं म्हटलं जात असताना भाजप किंवा मनसे कोणाकडूनही याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदारांपाठोपाठ खासदारही फुटणार?

“देर है अंधेर नही, उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येणार”

“केसरकर जास्त बोलू नका, तुमची लायकी काय हे आम्हाला माहिती, कशाला उड्या मारता”

“नवाब मलिकांनी केलेल्या कामाची दखल संपूर्ण देशाने घेतली”

“नशीब उरलेल्या खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, अगला राष्ट्रपती हमारा होगा”