एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, आमदारांपाठोपाठ खासदारही फुटणार?

मुंबई | शिंदे गटाची बंडखोरी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी बंडखोरी ठरली आहे. शिवसेनेचे तब्बल 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत फुटल्याने महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला.

बंडखोर आमदारांनी सुरत, गुवाहाटी, गोवा दौरा करत महाविकास आघाडीचे सरकार पाडले व भाजपच्या पाठिंब्यांने शिंदे सरकार सत्तेत आलं. त्यानंतर आमदारांपाठोपाठ शिवसनेचे नगरसेवक देखील शिंदे गटात सामील झाले.

आमदार व नगरसेवक फोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदारांची एकनाथ शिंदेंसोबत बैठक झाल्याचं समोर येत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी काल शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाल्याचं वृत्त आहे. शिंदे गट आमदारांप्रमाणे खासदारांचाही दोन तृतीयांश गट तयार करण्याच्या मार्गावर असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

आमदारांनंतर खासदार देखील फुटले तर शिवसेनेची ताकद कमी होण्याची शक्यता आहे. आमदार आणि नगरसेवकांनंतर शिवसनेचे खासदार फोडण्यात देखील शिंदे गटाला यश आलं तर शिवसेनेच्या प्रतिष्ठेला आणखी एक धक्का बसू शकतो.

दरम्यान, एक एक करत शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटात सामील झाले. शिवसेनेकडे आता 15 आमदार असताना अनेक खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“देर है अंधेर नही, उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची वेळ राज्यपालांवर येणार”

“केसरकर जास्त बोलू नका, तुमची लायकी काय हे आम्हाला माहिती, कशाला उड्या मारता”

“नवाब मलिकांनी केलेल्या कामाची दखल संपूर्ण देशाने घेतली”

“नशीब उरलेल्या खेळांडूंचा कॅप्टन अजून बोलला नाही, अगला राष्ट्रपती हमारा होगा”

पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तासात पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता