“आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, नाहीतर…”; तालिबान्यांचा थेट पाकड्यांना इशारा

काबूल | काल पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीत हल्ले केले होते. पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ होत असताना पाकिस्तानच्या कारवाईचा निषेध केला जातोय. अशातच आता अफगाणिस्तानने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीचे माहिती आणि संस्कृतीचे उपमंत्री आणि मुख्य प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी खोस्त आणि कुनार प्रांतांवर पाकिस्तानच्या नुकत्याच केलेल्या हवाई हल्ल्यांचा तीव्र निषेध केला.

अमेरिकेला पराभूत करून अफगाणांनी हे सिद्ध केले आहे की ते आपल्या देशाचे रक्षण करू शकतात, त्यामुळे पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या लोकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा इशारा देखील तालिबान्यांनी पाकिस्तानला दिला आहे.

राजनयिक माध्यमांतून आणि चर्चेतून हा प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा प्रकारांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणाव निर्माण होईल, असंही जबिउल्लाह मुजाहिद यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानी हवाई सेनेने आग्नेय खोस्त प्रांतातील स्पेरा जिल्ह्यात नागरिकांच्या घरांवर बॉम्ब हल्ले केले होते. त्यात कमीतकमी 60 नागरिकांचा मृत्यू झाल्याती माहिती समोर आली होती.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये ज्यावेळी राजकीय संकट येतं, त्यावेळी सैन्य कारवाई मोठ्या प्रमाणात वाढताना पहायला मिळते. अशातच आता पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाद शरिफ यावर काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हस्तमैथुन करणं ठरू शकतं धोकादायक; 20 वर्षाच्या मुलासोबत जे काही झालं ते…

IPL 2022: DK पुन्हा टीम इंडियात कमबॅक करणार?; विराट कोहली म्हणाला…

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण: आमदार गणेश नाईक यांना अटक होण्याची शक्यता!

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांनो… उद्यापासून मार्केटमध्ये ‘हा’ मोठा बदल होणार!

“दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव”, संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ