“…तर पुढील 50 वर्ष कॉंग्रेसला विरोधक म्हणूनच काढावी लागतील”

नवी दिल्ली | देशातील राजकारणात सध्या बरीच उलथा पालथ पाहायला मिळत आहे. कॉंग्रेस पक्षातील अनेक नेते एकमेकांवर नाराज असल्याच्या चर्चा चालू आहेत. कॉंग्रेस पक्षांतर्गत सध्या दोन गट पडले असून एक गट गांधी कुटुंबाविरोधी तर दुसरा गट गांधी कुटुंबासमवेत असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून देशातील राजकारणात कॉंग्रेसला उतरती कळा लागली आहे. 2014 पासून सलग दोन लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला हार पत्करावी लागली आहे. देशातील काही मोजक्याच राज्यांमध्ये कॉंग्रेस पक्ष सध्या सत्तेत आहे.

एकूणच मागच्या काही निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी अतिशय वाईट आहे. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षातील 23 वरिष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होत. पक्षाला मोठ्या बदलाची गरज असल्याचं त्यांनी या पत्रातून म्हटलं होतं. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गुलाब नमी आझाद यांनी आता याच मुद्द्यावरून एका मुलाखतीत महत्वाचं भाष्य केलं आहे.

येत्या काळात कॉंग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीद्वारे पक्षाचा नवीन अध्यक्ष निवडला जावू शकतो. जर पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्ष पहिल्यापेक्षा अधिक चांगली कामगिरी करेल अन्यथा पुढील 50 वर्ष पक्ष विरोधातच बसेल, असं गुलाब नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

पक्षांतर्गत निवडणुका झाल्या तर पक्षाची कामगिरी पहिल्यापेक्षा उत्तम होईलं. जे कोणी नेते आमच्या निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाचा विरोध करत आहेत ते नेते फक्त त्यांचे पक्षातील पद सांभाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असंही गुलाब नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

कॉंग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष कोण असेल यावरून पक्षात वाद चालले असले तरी तूर्तास सोनिया गांधी यांनी पक्षाचं हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं आहे.

दरम्यान, केंद्र पातळीवर काँग्रेस हा विरोधी पक्षातील महत्वाचा दुवा आहे. विरोधी पक्षांतील हा महत्वाचा दुवा दुर्बळ होऊ नये म्हणून पक्षांतर्गत स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपवली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘माझ्या ड्रिंकमध्ये ‘तो’ काहीतरी मिसळून मला प्यायला द्यायचा’; बॉलीवूड क्वीन कंगनाचा धक्कादायक खुलासा

सुशांतच्या बाबतीत माझा एकच गुन्हा झाला तो म्हणजे…; रिया चक्रवर्तीनं सोडलं मौन!

सुशांत प्रकरणातील ड्रग डीलर समजला जाणाऱ्या गौरव आर्याचा मोठा खुलासा

“सुशांतच्या मृत्युपूर्वी रियाच्या कुटुंबाकडून सुशांतवर तीन महिने जादूटोणा चालु होता”

‘लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं’; सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ठाकरे गरजले